crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
डोंबिवली: डोंबिवलीतील खोणी पलावा येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. आजोबा आणि मुलाने कंबरपट्टा व स्वयंपाकघरातील वस्तूंनी आई आणि मुलाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या हाणामारीत माय- लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी बिकाशकुमार गणेश यादव (वय 24) याने फिर्याद दाखल केली आहे. गेल्या आठवड्यात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आजोबा राजेंद्र राय यांनी बिकाशकुमारची आई रेणू यादव यांना जाब विचारला. तुझा मुलगा बिकाशकुमार काहीच काम करत नाही. माझ्या निवृत्ती वेतनावर मी तुम्हाला किती दिवस पोसू ? शिवाय माझ्या मोबाईलमधील पासवर्ड (पीन क्रमांक) कुणी बदलला ? असे त्यांनी विचारले. तेव्हा त्या मोबाईलचा पासवर्ड पीन नंबर हा आजोबांच्या सूचनेवरून बदलल्याचे मोठा भाऊ आकाशकुमार याने सांगितले. यावरून बिकाशकुमार आणि आकाशकुमार या दोन्ही भावांमध्ये वादावादी होऊन त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.
आईवरही मारहाण
स्वयंपाक घरातील तवा, लाटणे हाणामारीसाठी वापरण्यात आले. यात बिकाशकुमार गंभीर जखमी झाला. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी आई रेणू ही मध्ये पडली तर तिच्यावरही आकाशकुमारने हल्ला चढविला. आजोबा राजेंद्र यांनी चामडी पट्ट्याने रेणू यांना मारहाण केल्याचे बिकाशकुमार याने त्याच्या फिर्यादीत म्हटले आहे. यादव यांच्या घरातील भांडणाचा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी धावून आले. शेजारधर्म म्हणून सर्वांनी मिळून हा वाद सोडविला. घरात पडलेला रक्ताचा सडा पाहून रहिवासी हादरले. रहिवाशांनी या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या बिकाशकुमारसह त्याची आई रेणू यादव या दोन्ही माय-लेकाला उचलून तातडीने रूग्णालयात हलविले. सध्या तया दोघांची प्रकृती ठीक आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या खोणी पलाव्यातील भयंकर प्रकार उजेडात आला आहे. बिकाशकुमार गणेश यादव हा केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास करतो. त्याने या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. बिकाशकुमार हा कासा एड्रियाना येथे आई रेणू यादव, मोठा भाऊ आकाशकुमार (वय 26), आजोबा राजेंद्र राय (वय 76), आजी मालतीदेवी (वय 70) यांच्यासह एकत्र राहतो. तर बिकाशकुमारचे वडील पूर्वीपासून कुटुंबापासून विभक्त राहतात.त्याचे आजोबा राजेंद्र राय हे सेवानिवृत्त आहेत. त्यामुळे त्यांना निवृत्ती वेतन मिळते.
Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार