मंत्री बावणकुळेंच्या नावाने दमदाटी
नागपूर : कामठी रोडवरील ‘ईडन ग्रीन्स’ लॉन्समध्ये ‘फ्रेंडशिप डे’ पार्टी आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान दोन गटात वाद आणि नियमांचे उल्लंघनाची माहिती मिळाल्यानंतर जुनी कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांशी आयोजकांनी सहकार्य करण्याऐवजी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने दमदाटी केली. नियमांचे उल्लंघन करण्यासोबतच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आयोजकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासोबतच विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वतः बावनकुळे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपींवर सामान्य नागरिकांमध्ये मंत्र्यांची प्रतीम मलीन करून बदनामी केल्याचाही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime News: ‘तू खूप क्यूट आहेस, आपण फिरायला जाऊ,’ असे म्हणत स्कूल बसचालकाने विद्यार्थीनीचा केला विनयभंग
वेदांत छाबरीया, रितेश चंद्रशेखर भदाडे आणि आकाश बनमाली अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींनी रविवारी रात्री ईडन ग्रीन्समध्ये फ्रेंडशिप डेच्या पार्टसाठी रितसर पोलिसांची परवानगीही मागितली होती. पोलिसांनी नियमांचे पालन करण्याच्या अटीवर आयोजकांना परवानगी दिली. रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास पोलिसांना पार्टीमध्ये दोन गटात वाद झाला.
निश्चित कालावधीनंतरही कार्यक्रम सुरू असल्याने पोलिसांनी डीजे बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, आरोपींनी याकडे दुर्लक्ष केले. उपनिरीक्षक पांडे यांनी आयोजकांना पोलिस निरीक्षक जुमडे यांच्याशी बोलण्यास सांगितले. छाबरियाने बावनकुळेंकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानंतर संपूर्ण प्रकार उजेडात आला.
हेदेखील वाचा : Thane Crime News : नामांकित शाळेत ४ वर्षीय मुलीसोबत केले गैरकृत्य, निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने तिच्यासोबत…