crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
भंडाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यात ती गर्भवती राहिल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विविध प्रलोभन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं समोर आलं आहे. यात ती गर्भवती राहिली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आली. मात्र समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. याची माहिती होताच भंडारा ठाण्याचे पोलीस निरिक्षधक उल्हास भुसारी यांनी पुढाकार घेत कुटुंबीयांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून भांडारा पोलिसांनी आरोपी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वेदांत हिवराज आडवे (19) असे आहे.
भाची अनाथ झाली म्हणून घरी घेऊन आला, नंतर तिला गर्भवती केलं अन्.., जे झालं ते पाहून पोलिसांनाच बसला धक्का
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात नातेसंबंधांना लाज आणणारा एक प्रकार उघडकीस आला आहे. काकांनी मंदिरात स्वतःच्या भाचीची मागणी केली आणि तिच्याशी लग्न केले. प्रत्यक्षात काकांनी भाचीला घरात लपवून ठेवले होते, त्यानंतर त्याने तिच्याशी अवैध संबंध ठेवून तिला गर्भवती केले. जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा खटला टाळण्यासाठी काकांनी स्वतःच्या भाचीशी लग्न केले. नेमकी काय आहे घटना?
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील हे प्रकरण सुमेरपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पीडितेच्या पालकांच्या मृत्यूनंतर पोलीस स्टेशन परिसरातील एक मुलगी तिच्या आजीच्या घरी राहू लागली, त्यानंतर आरोपी काकाची नजर तिच्यावर पडली. नंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला. एवढचं नाहीतर पीडितेबरोबर अवैध संबंध ठेवून तिला गर्भवती केले. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले, कुटुंबाच्या पायाखालून जमीन सरकली आणि लोकांनी तिला विविध प्रकारे टोमणे मारण्यास सुरुवात केली.
जेव्हा कुटुंबाला कळले की मुलगी गर्भवती आहे. तेव्हा ते मुलीला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी काकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सांगितले तेव्हा काकांनी कुटुंब आणि गावकऱ्यांसमोर आपल्या भाचीशी लग्न करून तिला आपली वधू बनवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर कुटुंब आणि गावकऱ्यांनी सहमती दर्शवली. आरोपी पीडितेला घेऊन गावातील मंदिरात जाऊन लग्न करायला भाग पाडले. काही लोक या लग्नाला विरोध करत होते आणि त्यांना नातेसंबंधांचा खून म्हणून सल्ला देत होते.
दरम्यान, गर्भवती मुलगी सुमेरपूर पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा पोलिसांनी ताबडतोब प्रकरणाचा तपास सुरू केला, परंतु मुलीला गर्भवती करणारा व्यक्ती तिचा खरा काका असल्याने आणि मुलगी काकाच्या घरी राहत असल्याने कुटुंबाने त्यांचे लग्न करणे योग्य मानले. पोलीस ठाण्यात लग्नासाठी दोघांचीही संमती मिळाल्यानंतर दोघांचेही मंदिरात लग्न झाले. पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुप कुमार यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूच्या समेटानंतर दोघांचेही मंदिरात लग्न झाले,अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.