crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बीड : बीडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पुरुषासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृदावनीं सतीश फरतारे हिने आपल्या मैत्रीण अयोध्या राहुल व्हरकटे (वय २७, रा. लुखा मसला, ता. गेवराई) हिचा गळा दाबून खून केला. नेमकं काय प्रकरण?
Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?
नेमकं काय घडलं?
अयोध्या ही काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती. तरीही पोलीस होण्याचे तिचे स्वप्न होते आणि ती बीडमध्ये तयारी करत होती. वृंदावणीचे एका पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू होते. पण दीड वर्षांपूर्वी त्याची ओळख आयोध्याशी झाली आणि त्यानंतर त्याने वृंदावणीला बाजूला करून आयोध्याशी बोलणे सुरू केले. आयोध्याचे पती चार वर्षांपूर्वी अपघातात मयत झाले होते. त्यामुळे प्रियकराने आपल्याला दुरावल्याचा राग वृंदावणीला मनात होता. १९ ऑगस्ट रोजी सकाळी तिने आयोध्याला घरी बोलावून घेतले. त्यावेळी वाद वाढल्यावर आयोध्या ओरडू लागली, त्यामुळे संतापलेल्या वृंदावणीने तिचा गळा दाबून खून केला.
शेजाऱ्याकडून स्कूटी आणून घेतली आणि…
मृतदेह लपवण्यासाठी वृंदावणीने त्याला खोक्यात भरले. मुलगा शाळेतून आल्यावर ‘कचरा टाकायचा आहे’ असे सांगून त्याला दुचाकीवर घेऊन गेली. शेजाऱ्याकडून स्कूटी आणून घेतली आणि मुलाला चालवायला लावले. स्वतः मागे बसून तिने मृतदेह उमरद जहांगीर परिसरातील नाल्यात फेकून दिला. त्यानंतर ती स्कूटी धुऊन शेजाऱ्याला परत दिली. २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाचच्या सुमारास मृतदेह सापडला.
तब्बल पाच तास उडवाउडवीची उत्तरे
दरम्यान, आयोध्या बेपत्ता झाल्याची नोंद २० ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी तात्काळ वृंदावणीची चौकशी सुरू केली. तिने तब्बल पाच तास उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, तिच्याच प्रियकराने पोलिसांना माहिती दिल्याने आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. २१ ऑगस्ट रोजी पुन्हा चौकशीदरम्यान वृंदावणीने खुनाची कबुली दिली.या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वृंदावणी सतीश फरतारे हिला अटक केली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही…
दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधात होत्या. याच काळात वृंदावनी हिचा प्रियकर घरी येत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या यांच्याशी झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान देण्यात आले. मात्र मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती. आणि मग होत्याचे नव्हते झाले.. एका दिवशी आयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत.. असं म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची झाली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घृण हत्या केली.
नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केली
आयोध्या यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आयोध्या पोलीस दलातील होमगार्ड सेवेत रुजू झाल्या. त्यांना पोलीस दलात जायचं होते. त्यासाठी बीडमध्ये त्या सराव करत होत्या. मात्र तीन दिवसापासून त्यांचा फोन बंद आला. आणि नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केली. कुठेही आयोध्याचा संपर्क झाला नसल्याने नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले.