Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh: आधी विष देऊन मुलाची हत्या केली, नंतर पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलले; हृदय पिळवटून टाकणारा १३ पानांच्या सुसाईड नोट

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी पती पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. त्या आधी त्यांनी मुलाला विष दिले आणि त्याची हत्या केली. सावकारांच्या जाळ्यात अडकल्याने आणि कर्जाच्या ओझ्याखाली त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 30, 2025 | 11:24 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी पती पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. त्या आधी त्यांनी मुलाला विष दिले आणि त्याची हत्या केली. सावकारांच्या जाळ्यात अडकल्याने आणि कर्जाच्या ओझ्याखाली त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. हॅन्डलूम व्यापारी सचिन ग्रोव्हर (36) आणि त्याची पत्नी शिवांगी (34) आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा असे मृतकाचे नाव आहे. या दाम्पत्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरमधील दुर्गा एन्क्लेव्ह कॉलनीत घडली आहे. त्यांनी आत्महत्या करणाऱ्या आधी एक १३ पाणी सुसाईड नोट लिहून ठेवले होते. त्यात व्याजावर घेतलेल्या कर्जाव्यतिरिक्त इतर देणींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराला आला राग; प्रेयसीचा गळा चिरून केली हत्या

सचिन ग्रोव्हर सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या जाळ्यात अडकत राहिला, जे त्याने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी घेतले होते. त्याला पहिल्यांदा मित्र म्हणून भेटलेले सावकार त्याला व्याज वसूल करण्यासाठी त्रास देत होते. व्याज देण्यास असमर्थतेमुळे त्यांनी त्याच्या भावाची बाईक आणि त्याच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत कार ताब्यात घेतली होती. उद्योग केंद्राकडून घेतलेल्या कर्जाचे अनुदानही अडकले होते. यामुळे त्रासलेल्या हातमाग व्यावसायिक सचिन ग्रोव्हर याने टोकाचे पाऊल उचलत स्वतः सह पत्नी आणि मुलाचा दुर्दैवी अंत केला आहे. १३ पानांचा सुसाईड नोट पोलिसांना सापडला आहे.

१३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय?

या सुसाईड नोटमध्ये सचिनची पत्नी शिवांगीनेही तिच्या आईसाठी मजकूर लिहिला आहे. त्यात तिने लिहिले आहे की, “माफ करा आई, मी जे काहीही केले आहे, त्यासाठी मला माफी नाही. माझ्या मृत्यूनंतर माझी गाडी कर्जमुक्त होईल. सध्या ती एका ठिकाणी गहाण आहे. ती सोडा आणि साडेतीन लाख रुपयांना विकून टाका. मम्मी, कोणाचीही भीती बाळगण्याची किंवा दबावाखाली येण्याची गरज नाही. माझे घर विकून कर्ज फेड. आता सर्व काही तुमचे आहे. तुम्ही आम्हाला द्वेषाने लक्षात ठेवावे, वाईट आठवण म्हणून विसरून जावे असे आम्हाला वाटत नाही. -आय लव्ह यु फ्रॉम शिवांगी, सचिन, फतेह” असे या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

शिवांगीने पुढे लिहिले आहे की, कंपनीतील गाडी विकून टाका, तुम्हाला चांगले पैसे मिळतील. थोडा वेळ लागेल, पण सर्व काही ठीक होईल. जर सर्वांनी थोडा धीर धरला असता तर आज हे घडले नसते. सचिनने अनेक चुका केल्या आहेत, परंतु त्याने जाणूनबुजून काहीही केले नाही. काही लोक माझ्यामुळे अडचणीत आले आहेत. मला माफ करा, माझ्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता. आता जे घडत आहे ते बरोबर असू शकत नाही, कृपया ते मॅनेज करा, कृपया माझा द्वेष करू नका आणि माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला. ही त्यांची चूक नाही. शिवांगीने सचिनच्या कुटुंबाबद्दलही लिहिले आहे आणि त्यांच्यावर त्याला पाठिंबा न देण्याचा आरोप केला आहे.

सुसाईड नोटमध्ये लिहिलेली नावे पोलिसांकडून लपवण्याचा प्रयत्न?

सचिनने सुसाईड नोट १३ पानांच्या न खूप तपशीलवार लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने त्याला त्रास देणाऱ्यांची आणि ज्यांनी त्याला मदत केली नाही त्यांची नावे लिहिली आहेत. व्यापाऱ्याच्या मोबाईलमधून पोलिसांना सुसाईड नोटची पाने सापडली आहेत, परंतु पोलीस ती सार्वजनिक करत नाहीत. असा आरोप केला जातोय.

सुसाईड नोटमध्ये सावकारांची नावे लिहिली असल्याचे सांगितले जाते. सावकार अनेक मोठ्या लोकांचे जवळचे असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत पोलिसांचा दृष्टिकोन हलगर्जी झाला आहे. सुसाईड नोटचा अभ्यास केल्यानंतरच ते काहीतरी सांगतील असे पोलिस सांगत आहेत. मृताच्या कुटुंबीयांकडेही सुसाईड नोट आहे.

Nashik Crime : नाशिकच्या भाजप नेत्याच्या अडचणी वाढल्या, मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Web Title: First the child was killed by poisoning then the husband and wife took the extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • crime
  • Uttar Praadesh Crime
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा
1

Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा

Haryana Crime: एआय ब्लॅकमेलिंगचा बळी! बहिणींचे बनावट फोटो पाहून १९ वर्षीय राहुलने घेतला टोकाचं निर्णय
2

Haryana Crime: एआय ब्लॅकमेलिंगचा बळी! बहिणींचे बनावट फोटो पाहून १९ वर्षीय राहुलने घेतला टोकाचं निर्णय

Kopargaon riot case : आमदार काळेंचे स्वीय सहाय्यक अरुण जोशींसह तिघे पोलिसांना शरण
3

Kopargaon riot case : आमदार काळेंचे स्वीय सहाय्यक अरुण जोशींसह तिघे पोलिसांना शरण

Jalgao Crime: जळगावात दुर्दैवी अपघात; रुळ ओलांडताना दोन तरुणांचा मृत्यू, नात्याने मामा–भाचे
4

Jalgao Crime: जळगावात दुर्दैवी अपघात; रुळ ओलांडताना दोन तरुणांचा मृत्यू, नात्याने मामा–भाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.