प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराला आला राग; प्रेयसीचा गळा चिरून केली हत्या
अहमदाबाद : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना आता गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात प्रेमसंबंध तोडल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडचा चाकूने गळा चिरून हत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली.
यातील आरोपी मुलीच्या परिसरात राहत होता. मुलगी कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गांधीधामहून भुजला आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी भानुशाली कॉलेजमधून वसतिगृहात जात होती. दरम्यान, मोहित सिद्धपारा हा त्याचा मित्र जयेश ठाकोरसोबत दुचाकीवरून तिच्याकडे पोहोचला. सोशल मीडियावर त्याला अनफॉलो केल्याबद्दल तो संतप्त झाला होता. तो साक्षीला सोडून गावी परतण्यास आग्रह करत होता. त्यातच संबंधित तरूणीने आरोपी सोबत असलेले प्रेमसंबंध तोडले. त्यामुळे आरोपी चांगलाच संतापला होता.
दरम्यान, संबंधित मुलीने त्याचा प्रस्ताव नाकारला. यावर संतापलेल्या मोहितने चाकूने मुलीचा गळा चिरला. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुण्यातही खून प्रकरण उघडकीस
राज्यात गुन्हेगारी वाढली आहेत. राज्यातील वेगवेगऴ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना दररोज उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनादेखील यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हेदेखील वाचा : Beed crime: भीषण अपघात! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू; बीडमधील घटना