Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशींना ठोकल्या बेड्या; एटीएसची कारवाई

गोवंडीतील लोटस जंक्शन येथील जलेबी दुकानासमोर चार बांगलादेशी नागरिक येत असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 02, 2025 | 02:49 PM
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशींना ठोकल्या बेड्या; एटीएसची कारवाई

भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशींना ठोकल्या बेड्या; एटीएसची कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवाजीनगर पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीसी) मोठे यश मिळाले आहे. बनावट कागदपत्रांवर भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशींना एटीसीने अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक आणि एटीसी प्रमुख विक्रांत शिंदे यांनी हुसेन मोफिजुल शेख (वय २२), लिटन मोफिजुल शेख (वय २४), अन्सार अली सरदार (वय ४४), सुलेमान रहीम शेख (वय ३४) अशी चार स्थलांतरितांची ओळख पटवली.

ओळख लपवून मुंबईच्या विविध भागात मजूर म्हणून काम करत होता, असे उपनिरीक्षक विक्रांत शिंदे यांनी सांगितले. गोवंडीतील लोटस जंक्शन येथील जलेबी दुकानासमोर चार बांगलादेशी नागरिक येत असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. त्या आधारे, एटीसी सेलचे हवालदार निकम, शिंदे आणि पाटील यांनी सापळा रचला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूराव देशमुख यांनी म्हटले की, ‘आतापर्यंत आम्ही 80 हून अधिक लोकांची पडताळणी केली आहे. आम्हाला संशय आहे की ते बांगलादेशी आहेत आणि भारतात बेकायदेशीरपणे राहत आहेत. त्यांच्या माध्यमातून पोलिस येथे आणखी किती लोक लपले आहेत आणि त्यांना बेकायदेशीरपणे भारतात कोण आणत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत’.

वैध कागदपत्रे नाही

यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. वरील आरोपी, जो बांगलादेशी नागरिक आहे, त्याने बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. भारतात प्रवेश करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याने ते भारत सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर भारतात राहत होते.

पुण्यात बांगलादेशातील नागरिकांची वाढती संख्या

पुण्यासारख्या महानगरात बांगलादेशातून आलेल्यांची संख्या मोठी आहे. वेगवेगळ्या भागात वास्तव करणाऱ्यांना पुणे पोलिसांकडून पकडले जात असताना स्वारगेट परिसरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पकडले आहे. महर्षीनगर भागात ही कारवाई केली असून, मध्यभागातूनच बांगलादेशीला पकडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त केले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळविली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे

Web Title: Four bangladesh citizen illegally residing in india arrested nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Bangladesh People
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: प्रथितयश वकिलाला मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल करून तरुणीने उकळले दीड कोटी; घरात एकटा असताना…
1

Mumbai Crime: प्रथितयश वकिलाला मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल करून तरुणीने उकळले दीड कोटी; घरात एकटा असताना…

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
2

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना दिली नियमावली, शिवसेना आक्रमक
3

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना दिली नियमावली, शिवसेना आक्रमक

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना
4

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.