Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

Navi Mumbai Crime: वाशीच्या जुहूगाव परिसरात घरगुती वादातून धक्कादायक घटना घडल्याचा आरोप आहे. ६५ वर्षीय नंदा रत्नाकर कदम यांच्यावर त्यांचा मुलगा महेश रत्नाकर कदम याने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत नंदा कदम यांचा मृत्यू झाला असून, वाशी पोलिसांनी महेशला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 11, 2026 | 11:22 AM
Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वाशीच्या जुहूगाव परिसरात धक्कादायक घटना
  • ६५ वर्षीय नंदा कदम यांचा मृत्यू
  • मुलगा महेश कदमला पोलिसांकडून अटक
Vashi Mother Murder Case News : आई म्हणजे घराचा आधार. घरात तिची लगबग असली की सगळं काही सुरळीत सुरु असल्यासारखं वाटतं. मुलासाठी आई कितीही संकंट सहन करते. त्याच्या सुखासाठी स्वत:च्या गरजा बाजूला ठेवते. मात्र वाशीमध्ये घडलेल्या एका घटनेने आई- मुलाच्या नात्यालाच हादरा दिला आहे. घरातील वाद इतका टोकाला गेला की मुलानेच आपल्या जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचा आआरोप आहे. या घटनेने जुहूगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

वाशीच्या जुहूगाव भागात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. ६५ वर्षीय नंदा रत्नाकर कदम यांचा मुलगा महेश रत्नाकर कदम याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारात नंदा कदम यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाशी पोलिसांनी महेशला ताब्यात घेत अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

नंदा कदम या वाशीतील सेक्टर ११ मधील अष्टविनायक सोसायटीमध्ये राहत होत्या. मृत महिला, मुलगा, सून आणि नातवंडांसोबत एकाच घरात राहत होत्या. घरातील काही जुन्या कारणांवरून नंदा आणि त्यांच्या सुनेमध्ये अधूनमधून खटके उडत असल्याची माहिती समोर आली आहे. आई आपल्या मुलीच्या कुटुंबाकडे जास्त लक्ष देते, असा महेशचा समज असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

रविवारी संध्याकाळी याच मुद्द्यावरून घरात पुन्हा वाद झाला. सुरुवातीला साध्या बोलाचालीत सुरू झालेला हा वाद काही वेळातच वाढला. महेशचा राग अनावर झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने घरातील काचेच्या पॅनेलच्या मदतीने आईचा गळा आवळला. त्यानंतर तिचे डोके जमिनीवर आपटल्याचेही सांगण्यात आले. गंभीर दुखापतीमुळे नंदा कदम यांचा मृत्यू झाला. Navi Mumbai Crime:

स्थानिकांनी काय मदत केली?

घटनेनंतर घरात मोठा गोंधळ उडाला. आईचा जीव गेल्यानंतर महेश घरातच बसून ओरडत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. घरातून मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. परिस्थिती लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच वाशी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात आली. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे.

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

एका घरातील किरकोळ वाटणारा वाद एवढ्या भयंकर परिणामापर्यंत पोहोचू शकतो, हे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. रागाच्या क्षणी घेतलेला एक निर्णय संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आई-मुलाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकही हादरले आहेत.

नालासोपाऱ्यात दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

दरम्यान, नालासोपारा परिसरातही रविवारी एक दुर्दैवी अपघात झाला. कळंब समुद्रकिनाऱ्याकडे दुचाकीवरून जात असताना पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली १९ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

इब्राहिम शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नालासोपारा पूर्वेतील बिलाल पाडा भागात राहत होता. स्नेहा गायकवाड ही तरुणी या अपघातात जखमी झाली असून ती विक्रोळी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मित्राला भेटण्यासाठी ती विक्रोळीहून नालासोपारा-कळंब भागात आली होती. दोघे दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला.

जखमी स्नेहावर वसई येथील सर डी. एम. पेटीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघात कसा घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

Web Title: Vashi murder son kills mother in horrific domestic violence incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • crime news marathi
  • Mumbai Crime
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: सख्खे भाऊच बनले जल्लाद! दोन भावांनी सख्ख्या भावाच्या कुटुंबावर केले सपासप वार; बाप-लेकाचा मृत्यू
1

Mumbai Crime: सख्खे भाऊच बनले जल्लाद! दोन भावांनी सख्ख्या भावाच्या कुटुंबावर केले सपासप वार; बाप-लेकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.