बंदुकीचा धाक दाखवून बूट चाटायला लावले, लाथांनी मारहाण केली, अल्पवयीन मुलावर 4 जणांचा लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X)
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशाभरात महिलांवर होणार्या अन्याय अत्याचाराविरोधात जे जनआंदोलन उसळले त्यावरून महिलांवरील अन्याय कमी होईल अशी अशा होती. मात्र पोलिस दप्तरी नोंद झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची आकडेवारी बघितली तर ही अशा पूर्णत: फोल ठरते. असे असताना दिल्लीतून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका अल्पवयीन मुलाला बंदुकीचा धाक दाखवून चार आरोपीने त्याला पायाचे बूट चाटायला लावले. तसेच लाथांनी मारहाण केली त्यानंतर त्याच्यावर चार जणांनी सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ सप्टेंबर रोजी जहांगीरपुरी येथे आरोपीने पीडितेला ओढून नेले, पायाने चिरडले आणि बंदुकीच्या जोरावर त्यांचे बूट चाटण्यास भाग पाडले. एका अल्पवयीन मुलावर जबरदस्तीने बूट चाटण्याची आणि बंदुकीच्या जोरावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिल्लीत समोर आली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करत त्याचा चपला चाटण्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींवर पूर्वीचे गुन्हे नोंद आहेत. आरोपींवर खून, दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर प्रकरण उघडकीस आल्याचे दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. हरीश भाटिया, पंकज उर्फ माया, अभिषेक उर्फ अमन आणि आर्यन अशी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या आरोपींची नावे आहेत. चारही आरोपी जहांगीरपुरी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपीला वृंदावन येथून अटक केली आहे.
उत्तर-पश्चिम दिल्लीतील जहांगीरपुरी भागात एका गटाने 17 वर्षांच्या मुलाला आपली ताकत दाखवण्यासाठी आरोपींना त्याला बूट चाटण्यास भाग पाडले. तसेच त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, हरीश भाटिया (३८), पंकज उर्फ माया (३७), अभिषेक उर्फ अमन (२५) आणि आर्यन उर्फ मन्नू (२२) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी जहांगीरपुरी येथे आरोपीने पीडितेला ओढून नेले, पायाने चिरडले आणि बंदुकीच्या जोरावर त्याचे बूट चाटण्यास भाग पाडले. पोलिसांनी सांगितले की, पीडितेला अपमानित करण्यासाठी, आरोपींनी त्याच्याव लैंगिक अत्याचार केला आणि मोबाईल फोनवर व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.