Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?

चौघांनी हॉटेलचे शटर उघडून आत प्रवेश करत कोयत्याच्या धाकाने हॉटेलमध्ये लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2025 | 01:24 PM
कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?

कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ
  • कोयत्याच्या धाकाने दरोडा
  • कॅमेऱ्यात रात्रीचा थरार कैद
पुणे : कधी कोयता गँगची भररस्त्यात दहशत तर कधी कोयतेधारी लुटमार करणाऱ्यांचा धिंगाना सुरू असतानाच पुण्याचा मध्यभाग आणि रात्रीही रहदारी असलेल्या डेक्कनसारख्या परिसरातील हॉटेलचे शटर डाऊन केल्यानंतर देखील लुटमार करणाऱ्या चौघांनी शटर उघडून आत प्रवेश करत कोयत्याच्या धाकाने हॉटेलमध्ये लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात हॉटेल व्यवसायिक लक्ष्मीकांत गुंजकर (वय ४५, रा. आंबेगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, चार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे म्हात्रे पुल रोडवर अनंत रेस्टाँरट अँड बार आहे. पांडळे पॅलेसकडून म्हात्रे पुलाकडे जात असताना हे हॉटेल आहे. चौघे रात्री एकच्या सुमारास हॉटेलात आले, त्यांनी बिअरच्या किंमतीची विचारपूस केली आणि परत गेले. नंतर तक्रारदारांनी वेळ झाल्याने दीडच्या पुर्वीच हॉटेलचे शटर खाली घेतले आणि आतमध्ये क्लिनींग सुरू केले. तेव्हा एक टेबलावर काही ग्राहक जेवण करत होते. दरम्यान, चौघे पुन्हा हातात कोयते घेऊन आले. त्यांनी शटर उघडले आणि आत शिरले. तोंडाला मास्क आणि चेहऱ्यावर टोपी घालून आलेल्या चौघांनी थेट आत बसलेल्या ग्राहकांना तसेच मालकाला कोयत्याचा धाक दाखविला. त्यांना धमकावत गल्यात असलेली रोकड घेतली.

जमलेली जवळपास १५ ते २० हजारांची रोकड घेतल्यानंतर चौघेही तेथून बाहेर पडले आणि पळून गेले. घटनेनंतर घाबरलेल्या चालकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याघटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांकडून चौघांचा शोध सुरू करण्यात आला आहे. रात्रीपर्यंत त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळू शकली नव्हती. अधिक तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

Web Title: There has been an incident of thieves robbing a hotel in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

अरुण गवळीच्या गॅंगची साथ, शुल्लक कारण अन् गुन्हेगारीकडे वळण; जाणून घ्या बाबा बोडके टोळीचा इतिहास
1

अरुण गवळीच्या गॅंगची साथ, शुल्लक कारण अन् गुन्हेगारीकडे वळण; जाणून घ्या बाबा बोडके टोळीचा इतिहास

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला, ग्राहकांमध्ये भीतीचा माहोल
2

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला, ग्राहकांमध्ये भीतीचा माहोल

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…
3

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई
4

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.