Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘कॉप्स २४ बीट मार्शल’मधील चार पोलिस शिपायांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 15, 2025 | 12:20 PM
पुण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

पुण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:
  • दारूच्या नशेत नागरिकांशी दादागिरी करणं भोवलं
  • पुण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
  • गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांचे आदेश

पुणे : मद्यप्राशन करून नागरिकांशी गैरवर्तन तसेच धमकावण्याचे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘कॉप्स २४ बीट मार्शल’मधील चार पोलिस शिपायांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. योगेश सुरेश माळी, मुकेश श्रीधर वाळले, शंकर दत्ता धोत्रे आणि कैलास शेषराव फुपाटे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चारही कर्मचारी गुन्हे शाखेअंतर्गत कॉप्स २४ बीट मार्शल पथकात नेमणुकीवर होते.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून महत्वाकांक्षी कॉप्स २४ हा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. हद्दीत गस्त व पेट्रोलिंग तसेच घटनास्थळी तत्काळ पोहचून नागरिकांना मदत मिळावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला होता. गुन्हे शाखेच्या अंतर्गत हे कॉप्स २४ चे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, कॉप्स २४ चे कर्मचारी हे दुसरेच उद्योग करत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून दिसत आहे.

११ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास आळंदी रोड पोलिस चौकी हद्दीतील काही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकीत येऊन तक्रार नोंदवली. संबंधित चारही पोलिस शिपायांनी मद्यधुंद अवस्थेत व्यापाऱ्यांना धमकावत आरोप केला. या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच, दुसऱ्या दिवशी हजेरीदरम्यान या पोलिसांकडे वरिष्ठांनी विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांना निलंबित करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिले. कर्तव्यावर असताना मद्यप्राशन, नागरिकांशी अमानुष वर्तन केल्याचे व पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कर्तव्यावर असतानाच त्यांनी मद्य प्राशन केले होते. आळंदी रोड पोलिस चौकीच्या हद्दीत त्यांनी राडा घातला. आम्ही पोलिस आहे, आमचे कोणी काही करू शकत नाही. आमच्याकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करून देणार नाही असे बोलून गैरवर्तन करत शिवीगाळ केली.

समज दिल्यानंतरही सुधारणा नाही

निलंबीत करण्यात आलेल्या या चौघा बीट मार्शलला अनेकदा समज देण्यात आली होती. नेमणूक दिलेले काम न करणे, हजेरीला उपस्थित न राहणे, कामचुकारपना करणे अशी कृत्य त्यांनी यापुर्वी देखील केली. दरम्यानच्या कालावधीत त्यांना अनेकदा समज देखील देण्यात आली. परंतू त्यांच्या वर्तनात काही फरक पडलेला दिसून आला नाही. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांनी यातील दोघांचा कसुरी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता.

Web Title: Four police personnel in pune have been suspended abruptly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यातील आंबिल ओढा कॉलनीत भीषण आग; मीटर रूमला अचानक आग लागली अन्…
1

पुण्यातील आंबिल ओढा कॉलनीत भीषण आग; मीटर रूमला अचानक आग लागली अन्…

पुण्यात तापमानात आणखी घट; किमान तापमान 12.7 अंश सेल्सिअसवर
2

पुण्यात तापमानात आणखी घट; किमान तापमान 12.7 अंश सेल्सिअसवर

Navale Bridge Accident: वाहनांच्या तपासणीकडे आरटीओकडून दुर्लक्ष; बेशिस्त ५८ हजार वाहनधारकांवर कारवाई
3

Navale Bridge Accident: वाहनांच्या तपासणीकडे आरटीओकडून दुर्लक्ष; बेशिस्त ५८ हजार वाहनधारकांवर कारवाई

गोखले बिल्डर-स्मारक ट्रस्टमधील व्यवहार; Pune कोर्टाने दिला ‘हा’ मोठा आदेश
4

गोखले बिल्डर-स्मारक ट्रस्टमधील व्यवहार; Pune कोर्टाने दिला ‘हा’ मोठा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.