Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस असल्याची बतावणी करत महिलेची फसवणूक; विवस्त्र करुन केली तपासणी

सायबर चोरट्यांकडून कोट्यवधींचा गंडा घातला जात असताना आता या सायबर गुन्हेगारांनी महिलांना मानसिक व शारिरीक त्रास देण्यास देखील सुरूवात केली असून, तपासणीच्या नावाखाली महिलांचा विनयभंग करू लागले आहेत. या महिलेला पार्सलमध्ये ड्रग्स सापडल्याचे सांगून नंतर थरमल इमेजिंग करायचे असल्याचे सांगत महिलेला विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 25, 2024 | 05:07 PM
पोलीस असल्याची बतावणी करत महिलेची फसवणूक; विवस्त्र करुन केली तपासणी
Follow Us
Follow Us:

पुणे : सायबर चोरट्यांकडून कोट्यवधींचा गंडा घातला जात असताना आता या सायबर गुन्हेगारांनी महिलांना मानसिक व शारिरीक त्रास देण्यास देखील सुरूवात केली असून, तपासणीच्या नावाखाली महिलांचा विनयभंग करू लागले आहेत. या महिलेला पार्सलमध्ये ड्रग्स सापडल्याचे सांगून नंतर थरमल इमेजिंग करायचे असल्याचे सांगत महिलेला विवस्त्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने विश्रमबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ७ ते ११ ऑगस्ट दरम्यानच्या काळात घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पिडीत महिला आयटी कंपनीत नोकरी करतात. सायबर चोरट्याने महिलेशी संपर्क साधला व तुमच्या नावे मलेशिया येथे एक पार्सल पाठविले आहे. त्यात खोटे १२ एटीएम, खोटा पासपोर्ट व १४० ग्रॅम एमडी असल्याचे सांगितले. त्यांना अटकेची भीती दाखवली. मात्र, महिलेने त्यांना त्या पार्सलशी काही संबंध नसल्याचे सांगितले. परंतु, या सायबर चोरटयांनी यासाठी तुम्हाला पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल असे सांगितले.

दिल्लीतील वसंतकुंज पोलीस ठाण्यातून बोलत असल्याची बतावणी करून चोरट्यांनी एका बँकेत महिलेला पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने दोन लाख २२ हजार रुपये पाठविले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला. तुम्ही अमली पदार्थ शरीरात लपवले आहेत. थर्मल इमेजिंग करायची आहे, अशी बतावणी केली. चोरट्यांनी महिलेला ‘व्हिडीओ कॉल’ केला. चोरट्यांनी महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.

Web Title: Fraud of a woman by pretending to be a policeman undressed and examined nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 05:07 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
1

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
2

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
4

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.