अशोक खरातनंतर आणखी एक प्रकरण समोर; 'मी शंकर, तू पार्वती...' म्हणत अत्याचार फोटो सौजन्य: iStock)
पालघर : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. 200 पेक्षा जास्त महिलांसोबतचे अश्लिल व्हिडिओ समोर आले आहेत. याप्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिलेली असतानाच आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. ‘मी शंकर आणि तू माझी पार्वती आहेस, असे सांगून महिलेवर बलात्कार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेष वैद्यविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पुण्यातील ३५ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. वसई संस्थेचा प्रमुख ऋषिकेशशी २०२३ मध्ये फेसबुकवर तिची ओळख झाली. तिच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी जवळीक केली. डिसेंबर २०२३ मध्ये तिला भेटायला तो पुण्यात गेला. मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती आहेस, असे म्हणत त्याने तिला भुलवले. नंतर पुण्याच्या मांजरीतील लॉजमध्ये नेले आणि गुंगीचा पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.
भोंदूबाबा खरातचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून पतीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी त्यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपी ऋषिकेश विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी आरोपी ऋषिकेशने तिच्या नकळत तिची अश्लील छायाचित्रे काढली. त्याआधारे ब्लॅकमेल करून त्याने तिला पुन्हा भेटायला बोलावले. मे २०२५ मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये बोलावून पुन्हा अतिप्रसंग केला.
राजापुरातही तरुणीवर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, राजापुरातील एका अल्पवयीन मुलीला अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागले. या प्रकरणी राजापूर आणि वैभववाडी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मयूर सुर्वे, ओंकार सुर्वे आणि पंकज पवार या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या गंभीर प्रकरणाची पाश्र्वभूमी जुलै २०२५ पासून सुरू झाली. पीडित तरुणीची फेसबुकवर वैभववाडी येथील ओंकार सुर्वे याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत ओंकार आणि त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांनी तिला नापणे येथील धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने नेले. तिथे वेळ झाल्याचे सांगत तिला मयूरच्या जुन्या घरी नेण्यात आले आणि तिथेच या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.
हेदेखील वाचा : विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा






