अत्याचारातील नराधमाला जन्मठेप (फोटो - istockphoto)
अत्याचार प्रकरणातील नराधमाला जन्मठेप
रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निकाल
लांजा तालुक्यात घडलेली धक्कादायक घटना
रत्नागिरी: लांजा येथे ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणान्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठालाली. आशिष अनिल जाधव(प २०, लांजा असे आरोपीचे नाव आहे १५ जुलै २०२३ रोजी येथे अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी लांजा पोलिसांकडून आशिष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंचाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले, मुद्यातील माहितीनुसार १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पीडिता(Rape Case) शाळेतून सुटल्यानंतर घरी चालत जात होती. यावेळी तिच्यासोबत शाळेतील दोन मुलं होती.
यावेळी आसितोष हा पीडितेजवळ आला, त्याने तिच्यासोबत असलेल्या दोना मुलांना धमकावून वेगळ्या रस्त्याने ती जाण्यास सांगितले, घाबरलेली दीन्ही मुले वेगळ्या रसस्थाने घरी जाण्यास निघाली. एकटीच राहिलो असल्याचे पाहून आशितोष याने पीडितेचा जबरदस्तीने हात पकडला, जवळच असलेल्या एका शासकीय उपकेंद्राच्या मागील बाजुला ओडत नेऊन अत्याचार केला घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्ली घरी परतलेली पीडिता घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले.
‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास
नातेवाइकांनी पीडितेला धीर देत चौकशी केली असता तिने घडलेली घटना नातेवाईकांसमोर उघड केली. खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयापुढे पैरची म्हणून पोलिस कॉन्स्टेबल राजेश शिंदे यांनी काम पाहिले. याकरणी पीडितेच्या आईने लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आशितीष वाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुद्याचा तपास तत्कालिन सहाय्यक पोलिस निरिक्षक पी. की. देशमुख यांनी केला व यापुढे दोषारोपपत्र दाखल केले दरम्यान सरकार पक्षाकडून एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले पीडितेसोबत असलेल्या एका शाळकरी मुलाची देखील साक्ष नोंदविण्यात आली.
तीन महिन्यांच्या चिमूकल्याचा अंत अन् आईने उचलले भयंकर पाऊल; राहत्या घरी थेट…
कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास
आंब्याच्या बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विष्णूू प्रसाद डिल्ली कृष्ण न्यौपाने (६०) सध्या रा. कोचरा, वेंगुर्ला मूळ रा. नायरनमतलेस, पाल्पा, नेपाळ याला दोषी ठरवत विशेष न्यायाधीश श्रीम. व्हि. एस. देशमुख यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यातील ५ हजार रुपये रक्कम पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.






