Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नक्षलवाद्यांच्या गोळीपासून बचावले, पण अंघोळीसाठी जाताच काळाने गाठले; जवानाचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत

नक्षलवाद्यांच्या बंदुकीच्या सावटात कर्तव्य बजावत असलेल्या जवानासमोर अचानक वेगळेच संकट उभे ठाकले. अंघोळीसाठी गेलेल्या राहुल शिनगारे यांच्या हाताला विषारी सापाने दंश केला. सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 07, 2026 | 12:20 PM
नक्षलवाद्यांच्या गोळीपासून बचावले, पण अंघोळीसाठी जाताच काळाने गाठले; जवानाचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत

नक्षलवाद्यांच्या गोळीपासून बचावले, पण अंघोळीसाठी जाताच काळाने गाठले; जवानाचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत

Follow Us
Follow Us:
  • नक्षलविरोधी मोहिमेवर तैनात जवानाचा विषारी सर्पदंशाने मृत्यू
  • रेगडी परिसरात अंघोळीसाठी जाताना राहुल शिनगारे यांना सापाने दंश
  • गडचिरोलीत शासकीय इतमामात अंतिम मानवंदना; पार्थिव धुळ्याकडे रवाना 
 

गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात नक्षलविरोधी मोहिमेवर तैनात असलेल्या धुळे एसआरपीएफ गट क्रमांक सहाचे जवान राहुल प्रभाकर शिनगारे (वय ३७) यांचा विषारी सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. चामोर्शी तालुक्यातील रेगडी परिसरात कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

अंघोळीसाठी जाताच सापाने दंश केला

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शिनगारे हे नक्षलविरोधी मोहिमेसाठी रेगडी परिसरात तैनात होते. कर्तव्य बजावत असताना ते अंघोळीसाठी गेले होते. त्याचवेळी एका विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकारी जवानांनी तातडीने मदत केली आणि त्यांना उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा: मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख; कॅफेत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप, धमकीनंतर गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी दबाव

उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावली

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी राहुल शिनगारे यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, सर्पदंशातील विषाचा प्रभाव अधिक असल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नक्षलविरोधी मोहिमेत जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या जवानाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सहकारी जवानांमध्येही शोककळा पसरली.

पोलीस दलाकडून श्रद्धांजली

राहुल शिनगारे यांच्या निधनानंतर गडचिरोली पोलीस कवायत मैदानावर शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी आणि जवानांनी शिनगारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या उपस्थितीत राहुल शिनगारे यांना शासकीय इतमामात अंतिम मानवंदना देण्यात आली.

पार्थिव धुळ्याकडे रवाना

अंतिम मानवंदनेनंतर राहुल शिनगारे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी धुळे येथे रवाना करण्यात आले. नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने पोलीस दलासह त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. कुटुंबीयांवरही या दुर्दैवी घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Gadchiroli naxal operation srpf jawan rahul shingare snake bite death sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Death
  • Gadchiroli News

संबंधित बातम्या

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
1

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

खलनायिकेच्या भूमिकेने गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला वयाच्या ६५व्या वर्षी अखेरचा श्वास
2

खलनायिकेच्या भूमिकेने गाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला वयाच्या ६५व्या वर्षी अखेरचा श्वास

Ebola virus : ‘या’ देशात इबोलाचा कहर, मृतांच्या संख्येने चार हजारांचा आकडा गाठला
3

Ebola virus : ‘या’ देशात इबोलाचा कहर, मृतांच्या संख्येने चार हजारांचा आकडा गाठला

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…
4

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.