crime (फोटो सौजन्य: social media )
वाशीम: वाशीम जिल्ह्यातील रिसोड शहरात एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या पहिल्याच दिवशी सहकाऱ्यांच्या मदतीने नववधूने दागिने, रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांना या टोळीला जेरबंद करण्यात यश आलं आहे. तीन महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
नेमकं काय प्रकरण?
ही टोळी आधी श्रीमंत मुलांना मुलगी धाखवतात नंतर पारंपरिक पद्धतीने लग्न लावून देतात. त्यानंतर लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातील पैसे आणि दागिने घेऊन फरार होतात. या टोळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान भागात सक्रिय आहे. अनेक कुटुंबीयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले असून ४० हजार रुपयांचे दागिने आणि तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी रिसोड पोलीस अधिकचा तपास करत असून या प्रकरणात आणखी काही आरोपींसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अशीच एक घटना राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये मार्च महिन्यात घडली. मुण्डडिया हा मोठा परिसर आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दोन लाख रुपये खर्च करून लग्न केलं आणि बायको घरी घेऊन आला. तिच्यासोबत सुखी संसार करण्याची तो स्वप्न पाहत होता. पण हनीमूनच्या रात्री सर्व काही उलटंपालटं झालं. नवरीने त्याला गुंगी आणणारे औषध पाजलं आणि घरातून पळून गेले. पळतांना सोबत सोनं-चांदीचे दागिने, एक लाख रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तूही घेऊन गेली. पीडित व्यक्तीच्या माहितीवरून भादरा पोलिसांनी शुक्रवारी या घटनेबद्दल लग्नाच्या नावाखाली पैसे घेतलेल्या व्यक्ती आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाशीम हादरलं! मानसिक आजार आणि व्यसनाधीनतेतून पतीकडून पत्नीची हत्या
वाशीम जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीला दवाखान्यात नेण्याच्या मामुली वादातून पतीने पत्नीवर धारदार शास्त्राने वार करून तिची हत्या केली. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना वाशीम जिल्ह्यंक्तही कोठारी गावात घडली आहे. या घटनेने वाशीम जिल्ह्या हादरून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिम्मत धोंगडे (वय अंदाजे 40),कल्पना धोंगडे (वय अंदाजे 35) असे मृतकाचे नाव आहे. हिम्मत हा व्यक्ती व्यसनाधीन असून त्याला मानसिक आजाराचा त्रासही होता. कल्पना ही तिच्या पाटील उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा आग्रह धरत होती. मात्र या किरकोळ वादातून संतापलेल्या हिम्मत याने घरातील धारदार विळ्या -कुऱ्हाडीने पत्नीवर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या कल्पना ही घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर हिम्मत याने स्वतः देखील घर बंद करून आत गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे काही क्षणातच एकाच घरातील दोघांचा दुर्दैवी अंत झाला. या दुहेरी घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका क्षणात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्याने कोठारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्यातील लोहगाव भागात रिक्षाचालकावर हल्ला; बांबूने मारहाण करुन लुटले