
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: पुण्यात वनराज आंदेकरची सोमा गायकवाड टोळीने हत्या केल्यानंतर टोळीयुद्ध पेटलं होत. वनराजच्या हत्येचा बदला म्हणून स्वतःच्या नाताला बंडू आंदेकर टोळीने गोळ्या घालून आयुष कोमकरचा खून केला. त्यानंतर संपूर्ण बंडू आंदेकर कुटुंबावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. घरातील महिला वगळता सगळे सध्या तुरुंगात आहेत. मात्र आयुष कोमकर हत्या प्रकारानंतर सोमा गायकवाड टोळीचा बदला घेण्यासाठी वनराज आंदेकर खून प्रकारात ज्याने बंदूक पुरवली त्याचा भावाला काल गणेश काळे याला गोळ्या घालण्यात आल्या. टोळी युद्धातूनच गणेश काळेची काल हत्या करण्यात आली.
बंडू आंदेकर आणि कृष्ण आंदेकरवर पण गुन्हा दाखल
गणेश काळे हत्या प्रकरणात ९ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन जण अल्पवयीन आरोपी आहेत. टोळी चालवणारा बंडू आंदेकर आणि कृष्ण आंदेकर आणि इतर ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी युद्धात काल रिक्षा चालवणारा गणेश काळे याचा बळी गेला. काल रात्री उशिरा ४ गुन्हेगाराला खेड शिवापूर जवळ अटक करण्यात आली. आज या सगळ्यांना दुपारी कोर्टात हजर केल जाणे आहे. कोंढवा परिसर या हत्येने हादरून गेला होता.
कोयत्याने सपासप वार! फिल्मी स्टाईलने संपवल
गणेश काळे याच्यावर जवळपास ४ राउंड फायर करण्यात आले आणि त्या नंतर कोयत्याने पण त्याच्यावर वार करण्यात आले. हडपसर वरून इकडे येत असताना कोंढवा परिसरात त्याची हत्या करण्यात आली आहे. छातीला चार गोळ्या लागल्याने आणि कोयत्याने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश काळे याच्या भावाने वनराज आंदेकर खून घटनेत बंदुक पुरवली होती. सध्या त्याचा भाऊ हा आतमध्ये आहे. त्याच्या बदला म्हणून काल गणेश काळेची हत्या करण्यात आली आहे.
पुणे शहरात गुन्हेगारी कमी होण्याच नाव घेत नाही. दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातात. त्यांच्याकड येणाऱ्या बंदुकी, शस्त्र कुठून येतात याची चौकशी झाली पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे. पुण्यात टोळीयुद्ध नाही अस पोलीस म्हणतात मात्र दिवसा पुण्यात खून होत आहेत. गणेश काळे हत्येने पुन्हा सोमा गायकवाड आणि आंदेकर टोळीत गँगवार होवू शकते.
Pimpri Chinchvad: प्रेमविवादातून 18 वर्षीय प्रेयसीवर चॉपर हल्ला; विवाहित तरुणाला आला प्रेयसीवर संशय