काय घडलं नेमकं?
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ तरुणी आली असता आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर वार केले आहेत. मुख्य आरोपी योगेश भालेराव हा विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहते. प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध जुळल्याचा संशय योगेशला होता. याच संशयातून त्याने मित्रांच्या मदतीने तरुणीवर चॉपरने हल्ला केला आहे. या गंभीर घटनेनंतर पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियकर योगेश भालेराव (21) त्याचा साथीदार प्रेम लक्ष्मण वाघमारे (20) आणि एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.
संभाजीनगरमध्ये बनावट कॉलसेंटरचा भांडाफोड; महाराष्ट्र पोलिसांना थेट अमेरिकेतून ई-मेल
मी पण आयपीएस अधिकारी आहे अस सांगत मारल्या बाता! कोणत्या बॅचचा आहे विचारल्यावर पडलं पितळ उघड
पुणे शहरात सातत्याने काही ना काही घटना या फसवणुकीच्या पाहायला मिळतात. अनेक जण सरकारी नोकरी लावून देतो अस सांगत आर्थिक फसवणूक करतात किवा अधिकारी असल्याच सांगत कागदपत्रांची अफरातफर करताना आपण पाहील आहे. पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पुण्यातील पोलीस आयुक्तालयात एक जण आयपीएस अधिकारी आहे अस सांगत आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटला आणि माझे मित्र पण आयपीएस आहेत अस सांगितलं. कोणत्या बॅचचा आहे अस विचारल्यावर त्याच पितळ उघड पडलं आणि तो बोगस अधिकारी असल्याचं समोर आल. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर वाघमोडे अस या बोगस अधिकाऱ्याच नाव आहे. तो मूळचा हा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवाशी आहे. तो पुणे पोलीस आयुक्तालयात गेला आणि या जाळ्यात अडकला. वरिष्ठ पोलिसांना तो नक्की का भेटला? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर बाता मारत असताना त्याच्यावर संशय आला आणि त्याला सध्या ताब्यात घेण्यात आल आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिसांत बोलवून घेतलं आणि ताब्यात दिल आहे. त्याच्यावर आता पोलीस चौकशी करत आहेत.






