Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस

गुप्त माहितीच्या आधारे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने हॉटेल साई यशजवळील मोकळ्या जागेवर सापळा रचला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 04, 2026 | 07:51 AM
थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस

थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : एलपीजी गॅससाठी सुरू असलेल्या काळाबाजाराने थेट धोक्याची सीमाच ओलांडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरात गॅस टंचाईची झळ बसत असताना, वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवारात मध्यरात्री सुरू असलेल्या अवैध रिफिलिंगच्या अड्ड्यावर राज्यस्तरीय दक्षता पथकाने जणू सर्जिकल स्ट्राईकच केला.

टँकरमधून थेट व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत काळाबाजाराचे युद्ध छेडणाऱ्या रॅकेटला रंगेहात पकडण्यात आले. तब्बल १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक कृष्णा सखाराम दहिफळे (२९, रा. सावरगाव ता. परळी बीड), मेराज मोहम्मद जैश खान (४४, रा. टिटवाळा ता.जि. ठाणे, मुळ रा. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश), मुख्य सूत्रधार महेश थोरात, टँकर मालक श्रीहर छेदी आणि संबंधित वाहतूकदार यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कृष्णा दहिफळे आणि मेराज खान या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

गुरुवारी (दि.२) रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास राज्यस्तरीय दक्षता पथकाला मिळालेल्या, गुप्त माहितीच्या आधारे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने हॉटेल साई यशजवळील मोकळ्या जागेवर सापळा रचला. अधिकाऱ्यांनी काही काळ अंधारात लपून प्रत्यक्ष हालचालींचे निरीक्षण केले. त्यावेळी एलपीजी टँकरमधून रबरी पाईपच्या सहाय्याने थेट सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे दिसून आले. खात्री पटताच पथकाने धाड टाकत कारवाई केली. घटनास्थळी (एमएच-४३-सीके -५९२१) आणि (एमएच-४३-सीके-५७४७) या दोन एलपीजी टँकर संशयास्पद स्थितीत उभे आढळले. त्यापैकी एका टँकरचे अधिकृत सील तुटलेले असल्याचे तपासात उघड झाले.

1 कोटी 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

टँकरमधील गॅस चोरी करून तोच व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून बाजारात विक्रीसाठी तयार केला जात होता. छाप्यात, दोन टँकर, १९ किलो वजनाचे २० व्यावसायिक सिलेंडर (त्यात १७ भरलेले, ३ रिकामे), ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर, १४ किलोचा १ घरगुती सिलेंडर, तसेच गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी विशेष रबरी पाईप, मल्टी-व्हॉल्व उपकरणे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत १ कोटी २६ लाख ८७ हजार ९९९ रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : LPG टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका ! ‘इंडियन ऑइल’चा दररोज २८ लाख सिलिंडरचा पुरवठा; साठेबाजी टाळण्याचे आवाहन

Web Title: Gas theft directly from the tanker itself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 07:51 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Gas Cylinder
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

LPG सिलेंडरच्या किमतींवर होणार परिणाम? सरकारने LNG सप्लायवरील बंदी हटवली; जाणून घ्या नेमकं काय बदलणार
1

LPG सिलेंडरच्या किमतींवर होणार परिणाम? सरकारने LNG सप्लायवरील बंदी हटवली; जाणून घ्या नेमकं काय बदलणार

PM Modi on LPG: घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 2000 रुपये… मोदींच्या वक्तव्याने धक्का! संकटाच्या काळात नेमकं काय घडलं?
2

PM Modi on LPG: घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 2000 रुपये… मोदींच्या वक्तव्याने धक्का! संकटाच्या काळात नेमकं काय घडलं?

LPG Price : अरे वा…! महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, ‘हे’ आहेत नवे दर
3

LPG Price : अरे वा…! महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, ‘हे’ आहेत नवे दर

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.