Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार; कारमध्ये सापडला कोडेन सिरपचा मोठा साठा

Sambhajinagar News : संभाजीनगर शहरातील कटकट गेट परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत कारमधून कोडेन सिरपच्या ६०० बाटल्या जप्त केल्या. संगमनेर येथील संशयित मुख्य डीलर अयफाझ जब्बार शेख याचे नाव तांत्रिक तपासातून समोर आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 16, 2026 | 02:27 PM
600 Codeine Syrup Bottles Seized ( कोडीन सिरपच्या ६०० बाटल्या जप्त )

600 Codeine Syrup Bottles Seized ( कोडीन सिरपच्या ६०० बाटल्या जप्त )

Follow Us
Follow Us:
  • १४ नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली 
  • पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी कारजवळ आलेच नाहीत 
  • आरोपींची हुलकावणी 
Sambhajinagar News :  छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या औषधांचा अवैध पुरवठा करणाऱ्या संगमनेर येथील संशयित मुख्य डीलरचे नाव गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाच्या कारवाईत समोर आले आहे. कटकट गेट परिसरातील सदफ कॉलनीत उभ्या असलेल्या कारमध्ये कोडेन सिरपच्या ६०० बाटल्यांचा साठा आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित डीलर आणि त्याचे दोन साथीदार कार व सिरपचा साठा जागेवरच सोडून पसार झाले.

१४ नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली

पोलिसांनी तब्बल तीन तास सापळा रचून आरोपींची वाट पाहिली; मात्र ते परतलेच नाहीत. अखेर पोलिसांनी कारसह सव्वा लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली.अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक सचिन जाधव यांना बातमीदाराकडून कटकट गेट येथील सदफ कॉलनी, गल्ली क्रमांक दोनमध्ये समोसा गार्डनजवळ उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये (एमएच ०२ ईझेड ९६६०) कोडेन सिरपचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली.

एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर

पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी कारजवळ आलेच नाहीत

त्यानुसार उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. संशयित कार जागेवर आढळली; मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी कारजवळ आलेच नाहीत. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, हवालदार सतीश जाधव, देशराज मोरे, विशाल मेटे, नितेश सुंदर्डे, सरताज पठाण आणि चालक होमगार्ड पठाण यांच्या – पथकाने ही कारवाई केली.

आरोपींची हुलकावणी

संशयित परत येतील, या अपेक्षेने पोलिसांनी सुमारे तीन तास परिससत पाळत ठेवली. मात्र, कोणीही फिरकले नाही. पंचासमक्ष कारची तपासणी करण्यात आली. त्यात कोडेन सिरपच्या ६०० बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी सिरपचा साठा आणि कार जप्त केली, तांत्रिक विश्लेषणातून कारमालक अयफाझ जब्बार शेख (रा. गल्ली क्रमांक १, चिश्तिया मस्जिदजवळ, संगमनेर, जि. अहिल्यानगर) याचे नाव समोर आले. याप्रकरणी शेख याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला.

Amravati News: भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच! सोयाबीनची आवकही घटली; ४ दिवसांत दरात झाली घसरण

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी किती कोडेन सिरपच्या बाटल्या जप्त केल्या?

    Ans: कारमधून कोडेन सिरपच्या ६०० बाटल्या जप्त केल्या.

  • Que: कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: कटकट गेट परिसरातील सदफ कॉलनी, गल्ली क्रमांक दोन येथे ही कारवाई केली.

  • Que: कोणत्या दिवशी कारवाई केली?

    Ans: १४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ही कारवाई केली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar codeine syrup 600 bottles seized sangamner drug dealer sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Sambhaji nagar

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी
1

Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी

Deccan Odyssey Train Arrival :  राजेशाही थाटात डेक्कन ओडिसीचे संभाजीनगरात आगमन; ऑस्ट्रेलिया, लंडन, पोलंडचे ३६ पर्यटक दाखल!
2

Deccan Odyssey Train Arrival : राजेशाही थाटात डेक्कन ओडिसीचे संभाजीनगरात आगमन; ऑस्ट्रेलिया, लंडन, पोलंडचे ३६ पर्यटक दाखल!

Chhatrapati Sambhajinagar Crime : गांजा विक्रीचा आरोप करत तरुणाला लुटले; PhonePe मधून पैसे ट्रान्सफर, दोघांना अटक
3

Chhatrapati Sambhajinagar Crime : गांजा विक्रीचा आरोप करत तरुणाला लुटले; PhonePe मधून पैसे ट्रान्सफर, दोघांना अटक

Aurangabad Bench High Court : दिवाळीआधी सीजी पॉवर, गुडइयरला मोठा दिलासा! कारखाने बंद करण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
4

Aurangabad Bench High Court : दिवाळीआधी सीजी पॉवर, गुडइयरला मोठा दिलासा! कारखाने बंद करण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.