Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीचा विनयभंग; पोस्कोचा २४ तासांत कोर्टाकडून निर्णय; वन डे कारवाईची चर्चा

उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या विनयभंगाच्या घटनेने उल्हासनगर शहर सुन्न झाले होते, पण हिललाईन पोलिसांनी दाखवलेली जलदगती कारवाई उल्हासनगरवासियांसाठी दिलासादायक ठरली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2025 | 08:04 AM
POCSO ACT (फोटो सौजन्य- PINTEREST)

POCSO ACT (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या विनयभंगाच्या घटनेने उल्हासनगर शहर सुन्न झाले होते, पण हिललाईन पोलिसांनी दाखवलेली जलदगती कारवाई उल्हासनगरवासियांसाठी दिलासादायक ठरली. घटना घडल्यावर आरोपीला तत्काळ अटक, एक दिवसाची पोलिस कोठडी, आणि केवळ २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत पोलिसांनी न्यायप्रक्रियेला जबरदस्त वेग दिला आहे.

पाणीपुरवठ्यासाठी नवी कार्यपद्धती, समन्वयातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करणार : पालिका आयुक्तांचे निर्देश

उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका अल्पवयीन मुलीचा २८ वर्षीय नराधमाने विनयभंग केला. ही घटना समजताच पोलिसांनी प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव ठेवून तत्काळ पावले उचलली. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर हिललाईन पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

वेगवान न्यायप्रक्रियेचे उत्तम उदाहरण

पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या पथकाने छापा टाकत आरोपीला काही तासांत तत्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यावर एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पण विशेष म्हणजे, या एकाच दिवसात पोलिसांनी तपास पूर्ण करून साक्षीपुरावे गोळा केले आणि अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही कारवाई ‘वेगवान न्यायप्रक्रिया’ कशी असावी, याचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले की ही घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती. आमच्या पोलीस टीमने पूर्ण जबाबदारीने आणि तत्परतेने काम केलं. आरोपीला अटक करताच तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला. सर्व साक्षीपुरावे गोळा करून अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. आमचे उद्दिष्ट एकच आहे की आरोपीला शक्य तितकी कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला त्वरित आणि संपूर्ण न्याय मिळावा. समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना स्थान नाही, याचा ठोस संदेश देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Web Title: Girl molestation pocso court to decide within 24 hours one day action discussed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 08:04 AM

Topics:  

  • Molestation of Girl
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
1

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

Cyber Crime: पहलगाम हल्ल्यात नाव, डिजीटल अरेस्ट अन्… ; मुंबईत वृ्द्ध नागरिकाची लाखोंची फसवणूक
2

Cyber Crime: पहलगाम हल्ल्यात नाव, डिजीटल अरेस्ट अन्… ; मुंबईत वृ्द्ध नागरिकाची लाखोंची फसवणूक

Bank Scam: फेरफार करून कृत्रिमरित्या वाढवल्या शेअर्सच्या किमती; खाजगी बँकेत २००० कोटींचा घोटाळा उघड
3

Bank Scam: फेरफार करून कृत्रिमरित्या वाढवल्या शेअर्सच्या किमती; खाजगी बँकेत २००० कोटींचा घोटाळा उघड

Mumbai Traffic Update: ठाकरेंचा दसरा मेळावा अन् वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘या’ वाहनांना नो एन्ट्री
4

Mumbai Traffic Update: ठाकरेंचा दसरा मेळावा अन् वाहतूक व्यवस्थेत बदल; ‘या’ वाहनांना नो एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.