Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या हल्ल्यासाठी वापरलेली पल्सर बाईक अवघ्या २५ हजार रुपयांना खरेदी करण्यात आली होती. मात्र, नवरात्रीमुळे बाईकची कागदपत्रं ट्रान्सफर झाली नव्हती. आता या बाईकच्या मालकाची चौकशी सुरू झाली असून, तपासात आणखी काय समोर येणार?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 20, 2026 | 01:12 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • गोळीबारासाठी २५ हजारांची पल्सर
  • नवरात्रीमुळे कागदपत्रं ट्रान्सफर रखडली
  • बाईकच्या मालकाची पोलिसांकडून चौकशी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर जुहू येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या घटनेत वापरण्यात आलेल्या बाईकबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी गोळीबारासाठी वापरलेली पल्सर बाईक अवघ्या २५ हजार रुपयांना खरेदी केल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, बाईकची संपूर्ण आर्थिक देवाणघेवाण झाली होती; मात्र नवरात्रीमुळे तिच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांचं हस्तांतरण रखडलं होतं.

२५ हजार रुपयांना खरेदी केली पल्सर बाईक

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारासाठी वापरण्यात आलेली पल्सर बाईक मूळतः जोगेश्वरीतील एका व्यक्तीच्या नावावर होती. या पहिल्या मालकाने बाईक दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीकडून ती तिसऱ्या मालकाकडे गेली. पुढे या तिसऱ्या मालकाकडून संबंधित आरोपींनी ही बाईक २५ हजार रुपयांना खरेदी केली होती. बाईकच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण झाले होते आणि तिसऱ्या मालकाला ठरलेली रक्कमही मिळाली होती. मात्र, बाईकचं आरसी बुक आणि इतर कायदेशीर कागदपत्रं नव्या मालकाच्या नावावर हस्तांतरित करणं बाकी होतं. नवरात्रीचा काळ सुरू असल्यामुळे कागदपत्रांची प्रक्रिया नंतर पूर्ण करण्याचं ठरल्याची माहिती समोर आली आहे.

नवरात्रीमुळे कागदपत्रं ट्रान्सफर झाली नाहीत

बाईकची प्रत्यक्ष खरेदी झाली असली, तरी कागदोपत्री मालकी हस्तांतरण पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे गोळीबाराच्या घटनेनंतर तपासात या बाईकचा माग काढताना पोलिसांसमोर महत्त्वाचा दुवा आला. आरोपींनी याच बाईकचा वापर टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यासाठी केल्याची माहिती तपासात समोर आल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा: Tiger Shroff Firing Case : २ लाख रुपये कमावण्याचं आमिष दाखवलं; गोळीबार प्रकरणातील रेहानच्या आईचा दावा

बाईकच्या मालकाची पोलिसांकडून चौकशी

बाईक अद्याप कागदोपत्री जुन्याच मालकाच्या नावावर असल्याने मुंबई पोलिसांनी संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बाईक कोणाकडून खरेदी करण्यात आली, ती आरोपींपर्यंत कशी पोहोचली आणि व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग होता, याचा तपास केला जात आहे. या बाईकच्या खरेदी-विक्रीची साखळी आणि संबंधित व्यक्तींकडून मिळणारी माहिती यांचा आधार घेत पोलीस गोळीबार प्रकरणातील इतर संभाव्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी कोणती बाईक वापरण्यात आली?

    Ans: या प्रकरणात पल्सर बाईक वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • Que: बाईक किती रुपयांना खरेदी करण्यात आली होती?

    Ans: पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, ही बाईक २५ हजार रुपयांना खरेदी करण्यात आली होती.

  • Que: बाईकची कागदपत्रं ट्रान्सफर का झाली नव्हती?

    Ans: नवरात्रीमुळे आरसी बुक आणि इतर कायदेशीर कागदपत्रं नावावर करण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: Tiger shroff car firing case pulsar bike owner investigation sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Mumbai News
  • Mumbai Police
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट आठवडाभर आधीच रचला होता? शूटरही पोहोचले होते, पण पुढे काय घडलं?
1

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट आठवडाभर आधीच रचला होता? शूटरही पोहोचले होते, पण पुढे काय घडलं?

Tiger Shroff Firing Case : २ लाख रुपये कमावण्याचं आमिष दाखवलं; गोळीबार प्रकरणातील रेहानच्या आईचा दावा
2

Tiger Shroff Firing Case : २ लाख रुपये कमावण्याचं आमिष दाखवलं; गोळीबार प्रकरणातील रेहानच्या आईचा दावा

Success has many fathers…; मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
3

Success has many fathers…; मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! १५ लाखांत मिळणार तयार घरं; सरकारचा नवा निर्णय, कुठे मिळणार फ्लॅट?
4

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! १५ लाखांत मिळणार तयार घरं; सरकारचा नवा निर्णय, कुठे मिळणार फ्लॅट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.