Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime : गरबा खेळायला गेली, अन् पतीचा पाराचं चढला, पवईत घडली धक्कादायक घटना

Mumbai Crime : मुंबईतील पवई येथे गरबा खेळायला गेल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 21, 2026 | 06:38 PM
Mumbai Crime : गरबा खेळायला गेली, अन् पतीचा पाराचं चढला, पवईत घडली धक्कादायक घटना

Mumbai Crime : गरबा खेळायला गेली, अन् पतीचा पाराचं चढला, पवईत घडली धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:
  • पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न
  • मंडळात गरबा खेळल्याचा राग
  • दिल्लीमध्येही चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू
 

Mumbai Crime : मुंबईत नवरात्रीच्या सणात अनेक ठिकाणी गरबा रासचे आयोजन करण्यात आले होते. तरुणाईसह अनेक थोरामोठ्यांनीही या नवदिवसांत गरबा खेळण्याचा आनंद घेतला, मात्र पवई परिसरात एक अशी घटना घडली, ज्यामुळे हा परिसर हादरला आहे.

आपली पत्नी गरबा खेळायला गेल्याचा राग मनात ठेवून येथील एका पतीने चक्क तिच्या पोटात चाकू भोसकल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव वैशाली महेश रजत (वय 30) असे आहे. तर महेश सुभाष रजत (वय 35) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पवईतील आयआयटी परिसरातील महात्मा फुले नगर येथे, केडी रुग्णालयासमोरील समता मित्र मंडळाजवळ घडली.
वैशाली ही गरबा खेळण्यासाठी मंडळात गेली होती. पण तिचे गरबा खेळण्यास जाणे पतीला पटले नाही. त्यामुळे याच कारणावरून नाराज झालेल्या महेशने तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्याने तिच्या पोटात चाकू खुपसून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महेशवर लावण्यात आला आहे.

या प्रकरणी वैशालीच्या तक्रारीवरून पार्कसाइट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 109(1) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र

दिल्लीमध्येही चाकूहल्ला; एकाचा मृत्यू

दरम्यान, नवी दिल्लीतील मौर्य एन्क्लेव्ह परिसरातही चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, हल्ल्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे.

मंगळवारी पीतमपुरा येथील क्यूयू ब्लॉकमधील चौधरी डेअरीजवळ एका व्यक्तीला चाकू मारल्याची माहिती मौर्य एन्क्लेव्ह पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बीएसए रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अरुण नावाच्या व्यक्तीला मृत घोषित केले. आशू नावाची दुसरी व्यक्तीही चाकूहल्ल्यात जखमी झाली.

प्राथमिक तपासानुसार, एका तरुणीशी संबंधित वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. वादानंतर आरोपींनी दोन्ही व्यक्तींवर खंजीराने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईत पत्नीवर चाकूने हल्ला कुठे झाला?

    Ans: पवईतील आयआयटी परिसरातील महात्मा फुले नगर येथे, केडी रुग्णालयासमोरील समता मित्र मंडळाजवळ ही घटना घडली.

  • Que: पतीने पत्नीवर हल्ला का केला?

    Ans: पत्नी गरबा खेळण्यासाठी गेल्याच्या कारणावरून पती नाराज होता. याच रागातून त्याने हल्ला केल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात कोणती कलमे लावण्यात आली आहेत?

    Ans: पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Mumbai crime powai husband stabs wife over garba attack arrested rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Mumbai Police
  • Navratri
  • New Delhil

संबंधित बातम्या

नवरात्रीत वाहन विक्रीचा धुरळा!! अवघ्या 9 दिवसांत भारतात 10.32 लाख वाहनांची विक्री
1

नवरात्रीत वाहन विक्रीचा धुरळा!! अवघ्या 9 दिवसांत भारतात 10.32 लाख वाहनांची विक्री

Dussehra 2026: देवीला निरोप देण्यापूर्वी हे जाणून घ्या! दसऱ्याला घट विसर्जन कधी कराल? शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व
2

Dussehra 2026: देवीला निरोप देण्यापूर्वी हे जाणून घ्या! दसऱ्याला घट विसर्जन कधी कराल? शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा
3

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा

Success has many fathers…; मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
4

Success has many fathers…; मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.