Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरील पॅसेजमधून पडून मृत्यू झाला. घटनेवेळी तिच्यासोबत १० वर्षांची शेजारील मुलगी होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघी दिसत असून, चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला की तिला ढकलण्यात आले, याचा पोलीस तपास करत आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 16, 2026 | 09:00 AM
गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले

गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले

Follow Us
Follow Us:
  • १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू
  • घटनेवेळी सोबत १० वर्षांची मुलगी; सीसीटीव्ही ताब्यात
  • अपघात की घातपात? मांजरीवरून वादाचाही तपास
 

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील शिवशाही सोसायटीत १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरील पॅसेजमधून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली. विशेष म्हणजे, चिमुकली खाली पडली त्यावेळी तिच्यासोबत शेजारी राहणारी १० वर्षांची मुलगीही उपस्थित होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, अपघात की घातपात, याचा तपास सुरू आहे.

जेवणानंतर पॅसेजमध्ये खेळायला गेली होती चिमुकली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री जेवण झाल्यानंतर १८ महिन्यांची चिमुकली घराबाहेर सहाव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी शेजारी राहणारी १० वर्षांची मुलगीही तिथे होती. काही वेळातच चिमुकली अचानक खाली कोसळली. ती डक्टमधून खाली पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, तिचा तोल जाऊन ती पडली की तिला जाणीवपूर्वक ढकलण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चिमुकली पडल्यानंतर १० वर्षीय मुलगी निघून गेली
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकली खाली पडल्यानंतर १० वर्षांची मुलगी तिथून निघून गेली. त्यानंतर काही वेळाने ती पुन्हा पॅसेजमध्ये सायकल चालवताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली. त्यामुळे पोलिसांकडून या फुटेजचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याबाबत मुलीची माहितीही तपासात महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा: गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मांजरीवरून दोन्ही कुटुंबांत आधी वाद झाल्याचा दावा
पीडित कुटुंब १ ऑक्टोबर रोजी या इमारतीत राहण्यासाठी आले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मांजरीवरून दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वी वाद झाले होते. मात्र, या वादाचे नेमके कारण काय होते आणि त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या दिशेनेही तपास केला जात आहे.

आईची न्यायासाठी आर्त हाक
चिमुकलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत मुलीचे वडील वाहनचालक असून आई गृहिणी आहे. या कुटुंबाला अन्य चार मुले आहेत. “शेजारच्या मुलीसोबत असताना माझ्या चिमुकलीचा असा मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणी चिमुकलीच्या आईने केली आहे.

१० वर्षीय मुलीविरोधात गुन्हा दाखल होणार?
दरम्यान, या प्रकरणात १० वर्षीय मुलीविरोधात थेट गुन्हा दाखल होईल का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २१ नुसार, सात वर्षांपेक्षा जास्त आणि १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाने केलेली कृती ही त्या मुलाला आपल्या कृतीचे स्वरूप व परिणाम समजण्याइतकी परिपक्वता आहे की नाही, यावर कायदेशीरदृष्ट्या अवलंबून असते. त्यामुळे मुलीचे वय, तिची समज, परिस्थितीचे आकलन आणि हेतू यांचा विचार करूनच पुढील कायदेशीर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोरेगावात चिमुकलीसोबत नेमके काय घडले?

    Ans: गोरेगाव पूर्वेतील शिवशाही सोसायटीत १८ महिन्यांची चिमुकली सहाव्या मजल्यावरील पॅसेजमधून खाली पडली. यात तिचा मृत्यू झाला.

  • Que: हा अपघात होता की घातपात?

    Ans: याबाबत अद्याप स्पष्टता नाही. चिमुकलीचा तोल गेला की तिला ढकलण्यात आले, याचा पोलीस तपास करत आहेत.

  • Que: दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वी वाद झाला होता का?

    Ans: पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, मांजरीवरून दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वी वाद झाले होते. या वादाचा घटनेशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे

Web Title: Goregaon 18 month old girl death sixth floor cctv investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Child Death
  • crime news mumbai

संबंधित बातम्या

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत
1

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.