Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत

मुंबईतील सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर शिवचरण आप्पा पाटील यांचा वसतीगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी ते रुग्णालयात कामावर न आल्याने सहकाऱ्याने त्यांच्या खोलीत जाऊन पाहिले. बाथरूममध्ये ते मृतावस्थेत आढळले. हाताला IV सलाईन आणि ॲनेस्थेशियाच्या औषधांच्या बाटल्या सापडल्या.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 11, 2026 | 04:55 PM
Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत

Follow Us
Follow Us:
  • सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर शिवचरण पाटील यांचा मृत्यू
  • बाथरूममध्ये IV सलाईन, ॲनेस्थेशियाच्या दोन बाटल्या सापडल्या
  • मृत्यूचे कारण पोलिस तपासातून स्पष्ट होणार
मुंबई : सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर शिवचरण आप्पा पाटील यांचा शनिवारी संध्याकाळी रुग्णालयाच्या पीजी वसतीगृहातील खोलीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. शिवचरण पाटील हे सर्जरी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूमागे ॲनेस्थेशियाच्या औषधांचा वापर झाल्याचा संशय असून, याबाबत पोलिस तपास सुरू आहे.

रुग्णालयात न आल्याने सहकाऱ्याने घेतला शोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी शिवचरण पाटील रुग्णालयातील वॉर्डमध्ये कामासाठी आले नसल्याचे लक्षात आले. ते रुग्णालयाच्या पीजी वसतीगृहात राहत असल्याने त्यांच्या रूम पार्टनरला खोलीत जाऊन पाहण्यास सांगण्यात आले. सहकारी खोलीत पोहोचला असता शिवचरण दिसून आले नाहीत. त्यांना फोन केला असता मोबाईलचा आवाज बाथरूममधून ऐकू आला. त्यामुळे सहकाऱ्याला संशय आला आणि त्याने याबाबत इतरांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

हेही वाचा: पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…

बाथरूममध्ये आढळले मृतावस्थेत

पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा उघडल्यानंतर शिवचरण पाटील मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या हाताला IV सलाईन लावलेली होती. तसेच कमोडमध्ये ॲनेस्थेशियाच्या औषधांच्या दोन बाटल्या आढळल्या. प्राथमिक तपासात त्यांनी हे औषध स्वतःच्या शरीरात घेतले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी एडीआर रिपोर्टनंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. नातेवाईकांना सायन रुग्णालयात किंवा त्यांच्या इच्छेनुसार अन्य ठिकाणी शवविच्छेदन करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले की, शिवचरण पाटील हे होतकरू भावी सर्जन होते. त्यांच्या निधनामुळे रुग्णालयाने एक गुणी डॉक्टर गमावला आहे. या घटनेमागील नेमके कारण पोलिस तपासातून समोर येईल. रुग्णालयाकडून या प्रकरणाची अंतर्गत चौकशीही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत अधिक संवेदनशील राहून त्यांना आवश्यक मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Sion hospital resident doctor shivcharan patil death hostel mumbai sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • crime news mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Sion Hospital Case : सायन रुग्णालयात निवासी डॅाक्टराची आत्महत्या, वस्तीगृहाच्या बाथरूम मध्ये आढळला मृतदेह; नेमक कारण काय ?
1

Sion Hospital Case : सायन रुग्णालयात निवासी डॅाक्टराची आत्महत्या, वस्तीगृहाच्या बाथरूम मध्ये आढळला मृतदेह; नेमक कारण काय ?

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
2

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप
3

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप

Mumbai News : मुंबईच्या ७ कोळीवाड्यांचे सीमांकन तीन महिन्यांत पूर्ण होणार; समिती गठीत, भूमिपुत्रांना मिळणार लवकरच न्याय
4

Mumbai News : मुंबईच्या ७ कोळीवाड्यांचे सीमांकन तीन महिन्यांत पूर्ण होणार; समिती गठीत, भूमिपुत्रांना मिळणार लवकरच न्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.