Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

शासकीय कामे करूनही वेळेवर बिले मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप होत आहे. सांगलीतील एका तरुण कंत्राटदाराच्या मृत्यूने या प्रश्नाला पुन्हा वाचा फुटली आहे. या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर थेट गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील हजारो कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी नेमकी कधी मिळणार...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 26, 2026 | 02:58 PM
शासकीय कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

शासकीय कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • शासकीय कामाचे बिल रखडल्याने कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याचा आरोप
  • राज्यातील कंत्राटदारांची तब्बल ९० हजार कोटी रुपयांची बिले थकीत असल्याचा रोहित पवारांचा दावा
  • ‘ही आत्महत्या नसून सरकारने केलेला खून’, असा रोहित पवारांचा संताप
पुणे : शासकीय कामाचे बिल वेळेवर न मिळाल्याने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर राज्यातील शासकीय कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

रोहित पवार यांनी हर्षल पाटील यांच्या मृत्यूला केवळ आत्महत्या न म्हणता, ‘सरकारने केलेला खून’ असे संबोधले आहे. कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

९० हजार कोटींची थकबाकी?

रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, राज्यातील कंत्राटदारांची तब्बल ९० हजार कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. सुरुवातीला हर्षल पाटील यांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेवर मिळत होते. मात्र, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘पैसे नाहीत’ असे सांगण्यात येत होते, असा दावा पवार यांनी केला आहे. छोट्या कंत्राटदारांना या आर्थिक अडचणीचा मोठा फटका बसत असून, कामासाठी घेतलेले कर्ज, मजुरांचे पैसे, साहित्य खरेदी आणि इतर खर्च भागवताना त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने हनीट्रॅपचा डाव उधळला; दोघी महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल

‘कंत्राटदारांना वाऱ्यावर सोडले’

सरकारकडून विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असताना विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांची बिले मात्र प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. निवडणुका जिंकण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली जाते; मात्र प्रत्यक्ष विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या थकीत बिलांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका त्यांनी केली.

राज्यात सुमारे एक लाख कंत्राटदार असून त्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. कंत्राटदारांची थकीत बिले तातडीने अदा करावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कंत्राटदार महासंघाचीही आक्रमक भूमिका

हर्षल पाटील यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानेही संताप व्यक्त केला. शासनाकडून वेळेवर बिले न मिळाल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे शासकीय कामांची बिले मंजूर होऊनही ती प्रत्यक्षात कंत्राटदारांच्या खात्यावर जमा होण्यासाठी लागणारा वेळ, निधीची उपलब्धता आणि विभागीय पातळीवरील प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारने थकीत बिलांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून कंत्राटदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

रोहित पवार यांनीही थकीत रक्कम तातडीने देण्याची मागणी करत सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.

Web Title: Government contractor driven to the brink of suicide rohit pawar levels serious allegations against the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Maharashtra Politics news
  • MLA Rohit Pawar
  • Suicide case

संबंधित बातम्या

रोहित पवारांच्या PA च्या लेकीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात एकच खळबळ
1

रोहित पवारांच्या PA च्या लेकीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात एकच खळबळ

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
2

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
3

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.