Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune MPSC Students Protest: एस.एम. जोशी पुलावरील आंदोलन स्थळ रिकामे करा!; पुणे पोलिसांचे MPSC विद्यार्थ्यांना आदेश

Pune News, MPSC: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही आंदोलन सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आंदोलन बेकायदा असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी आंदोलकांना लेखी आणि तोंडी सूचना दिल्या होत्या.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 08, 2026 | 02:03 PM
Pune News, MPSC, Rohit Pawar, Pune Police, Education News,

Pune News, MPSC, Rohit Pawar, Pune Police, Education News,

Follow Us
Follow Us:
  • एस.एम. जोशी पुलावर गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन
  • पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या सुधारित आंदोलनाची परवानगी नाकारली
  • आंदोलन बेकायदा असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी आंदोलकांना लेखी आणि तोंडी सूचना
Pune MPSC Students Protest: पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पत्रकार भवनाजवळील एस.एम. जोशी पुलावर गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पण ही जागा तातडीने रिकामी करावी, असे आदेश पुणे पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले आहेत. आंदोलकांनी पर्यायी ठिकाणासाठी परवानगी मागितल्यास त्यासंबंधी सकारात्मक विचार करू, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पण पुणे पोलिसांच्या या आदेशामुळे पुण्यातही राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Pune MPSC Student Protest)

पुण्यात २ ऑक्टोबरपासून पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याची सुधारित परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मैदानात निश्चित केलेल्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी मागावी, अशी सुचना दिली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी झालेल्या मुख्यमंत्री आणि विद्यार्थ्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागणी करण्यात आल्या होत्या, असा दावाही करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नियोजित धरणे आंदोलन स्थगित करत असल्याचे पत्रही देण्यात आले होते.

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

विद्यार्थ्यांच्या वतीने नियोजित धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचं पत्रही देण्यात आलं होतं. त्यामुळे यापूर्वी आंदोलनासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.पण त्यानंतरही १ ऑक्टोबरला कोणतीही पूर्वपरवानगी न घेता एस.एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थ्यांचा जमाव जमवून धरणे आंदोलन सुरू करण्यत आले.या आंदोलनात चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या आंदोलनामुळे संपूर्ण परिसरातील वाहतुकीवर परिणाम होत असल्याचेही पोलिसांच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही आंदोलन सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आंदोलन बेकायदा असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी आंदोलकांना लेखी आणि तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्यात आले. आंदोलनादरम्यान ‘पुणे बंद पाडू’ अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचाही उल्लेख पोलिसांच्या आदेशात आहे. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतुकीची कोंडी होत असून, स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

पर्यायी ठिकाणी आंदोलन करण्याचा पर्याय खुला

पुणे शहराचे पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून एस. एम. जोशी पूल आणि पत्रकार भवनाजवळील सार्वजनिक रस्त्यावर धरणे आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आंदोलकांनी संबंधित परिसर तातडीने रिकामा करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी पर्यायी ठिकाणांचा पर्याय देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर किंवा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी निश्चित वेळेसाठी आंदोलन करण्याची परवानगी मागितल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून पुण्यातील वातावरण तापले असताना पोलिसांच्या या आदेशानंतर आंदोलक कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Pune police issue notice to mpsc students to vacate sm joshi bridge protest site

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • MLA Rohit Pawar
  • MPSC

संबंधित बातम्या

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
1

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’
2

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
3

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
4

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.