Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujarat Crime: भाचीशी बोलणाऱ्या तरुणांना कारने उडवलं; CCTVमुळे कट उघड, दोघे मामा अटकेत

गुजरातच्या जुनागढमध्ये एका तरुणीशी बोलत असल्याच्या रागातून दोन मामांनी कारने दुचाकीला मुद्दाम धडक देत दोन तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा अपघात नसून कट असल्याचं उघड झालं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 15, 2026 | 11:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भाचीशी बोलत असल्याच्या रागातून तरुणांवर जीवघेणा हल्ला.
  • कारने दुचाकीला मुद्दाम धडक देत तरुणांना फरफटत नेलं.
  • सीसीटीव्ही फुटेजमुळे कट उघड; दोन्ही आरोपी मामा अटकेत.
गुजरात: गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणीशी बोलत असल्याच्या संशयातून दोन मामांनी एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला हा प्रकार साधा अपघात असल्याचं वाटत होतं, मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर कारने मुद्दाम दुचाकीला धडक देत तरुणांना फरफटत नेल्याचं धक्कादायक सत्य उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी मामांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Uttarpradesh Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोस्टमास्तरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून तरुणाची आर्त हाक

काय घडलं नेमकं?

१० जून रोजी घडली. दोन तरुण आपल्या दुचाकीवरून जात असतांना पाठीमागून एका भरधाव कारणे जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाले. या अपघातात जखमी झालेल्या तरुणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सुरुवातीला अपघात असल्याचे वाटले होते. मात्र पोलिसांच्या चतुराईने हा कट उधळून लावला.

पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा पोलिसांना मोठा संशय आला. फुटेजमध्ये कारचालक मुद्दाम आणि थेट दुचाकीच्या दिशेने कार वेगाने आणून धडक देत असल्याचे स्पष्ट दिसत होते. एवढेच नाही तर धडक दिल्यानंतर दुचाकीवरील तरुणांना काही अंतरापर्यंत कारने घसटत नेल्याचेही समोर आले. हा अपघात नसून तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे सिद्ध झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तेव्हा कौटुंबिक वादाची आणि वैमनस्याची बाजू समोर आली.

कारण काय?

या प्रकरणातील मुख्य आरोपी याकूब घमेरिया आणि अनवर घमेरिया अशी आहे. ते शेपा गावचे रहिवासी आहेत. पीडित तरुण हा या दोन्ही आरोपींच्या भाचीसोबत फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलत होता. आरोपी मामांना त्यांच्या भाचीचे या तरुणाशी बोलणे अजिबात पसंत नव्हते. त्यांनी यापूर्वीही तरुणाला त्यांच्या भाचीपासून दूर राहण्याची आणि न बोलण्याची ताकीद दिली होती. मात्र, तरीही त्यांचे बोलणे सुरु होते. यामुळे मामांनी तरुणाचा काटा काढण्याचे ठरवले आणि अपघाताचा कट रचला.पोलिसांनी याकूब घमेरिया आणि अनवर घमेरिया या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Palghar Crime: भरदिवसा तरुणीवर हल्ला करून फरार, आरोपीचे आत्महत्येचे दोन प्रयत्न फसले; अखेर पोलिसांच्या ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: आरोपींनी तरुणांवर हल्ला का केला?

    Ans: पीडित तरुण आरोपींच्या भाचीशी बोलत असल्याचा राग आरोपी मामांच्या मनात होता.

  • Que: पोलिसांना कटाचा उलगडा कसा झाला?

    Ans: घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर कारने मुद्दाम धडक दिल्याचं स्पष्ट झालं.

Web Title: Gujarat crime youths talking to niece run over by car cctv exposes plot two maternal uncles arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.