नेमकं काय प्रकरण?
पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा 27 वर्षीय स्नेहल सावंत नावाच्या तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणातील आरोपीचे नाव अमोल मुळे असे आहे. हल्ला केल्यानंतर तो तिथून फरार झाला. त्यांनतर अमोल हा केळवा बीच परिसरात गेला होता. तेथे त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र,गळफासासाठी वापरलेली दोरी तुटल्याने तो बचावला. त्यानंतरही त्याने कथितरित्या विष प्राशन करून आत्महत्येचा दुसरा प्रयत्न केला.
Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत
तो वरखुंटी परिसरातील एका वाडीत बसला. पोलिसांना संशयास्पद अवस्थेत एक व्यक्ती बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तात्काळ दखल घेत पालघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता तोच कोयता हल्ला प्रकरणातील फरार आरोपी अमोल मुळे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपीवर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु
विष प्राशन केल्यामुळे आरोपीची प्रकृती खालावली. पोलिसांनी तातडीने पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यांनतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. आरोपीवर वैद्यकीय उपचार सुरू असून पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला ठेवण्यात आले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून या हल्ल्यामागील नेमके कारण काय? याची चौकशी आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Pune Crime : रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले; दुचाकीवरील चौघांवर गुन्हा दाखल
Ans: तो पालघरच्या वरखुंटी परिसरातील एका वाडीत संशयास्पद अवस्थेत आढळला.
Ans: त्याने प्रथम गळफास घेण्याचा आणि नंतर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.
Ans: पोलिसांनी विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध घेत अखेर त्याला अटक केली.






