काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव निखिल वर्मा असे आहे. निखिलने त्याच्या घराजवळील शेतात असलेल्या एक छोट्या खोलीत गळफास लावून आपले जीवन संपवले. बराच वेळ तो न दिसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला तेव्हा त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशात सुसाईड नोट सापडली. त्याने आपल्या पालकांची माफी मागत आपली व्यथा मांडली होती.
Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत
सुसाईड नोट मध्ये काय?
‘मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलो आहे. पोस्टल अधीक्षक माझ्याकडे पैशांची मागणी करत असून, पैसे न दिल्यास नोकरी करू देणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. माझ्या मृत्यूला मेल ओव्हरसीअर आणि पोस्टल अधीक्षक जबाबदार आहेत,’ असे निखिलने चिठ्ठीत नमूद केले आहे.
पैसे न दिल्यास नोकरीवरून काढून टाकू…
निखिलचे वडील धर्मेंद्र यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल हा जिल्ह्यातील मुदई उप-टपाल कार्यालयात कार्यरत होता. सुट्ट्या मंजूर करण्यासाठी तेथील मेल ओव्हरसीअर त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. या पैशांमध्ये पोस्टल अधीक्षकांचाही वाटा असतो, असे सांगून निखिलला धमकावले जात होते. पैसे न दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची भीती सतत दाखवली जात असल्याने निखिल गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता, असे त्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
तब्बल 10 तास धरणे आंदोलन
पोलिसांनी पोस्टल अधीक्षक सुशील कुमार यांच्यासह दोन अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करावी अशी मागणी करत तब्बल 10 तास धरणे आंदोलन निखिलच्या कुटुंबीयांनी केली. अखेर पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी अधिकारी सध्या फरार आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करता आहे.
Ans: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक छळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये केला आहे.
Ans: ‘माझ्या मृत्यूस मेल ओव्हरसीअर आणि पोस्टल अधीक्षक जबाबदार आहेत,’ असे त्यांनी नमूद केले होते.
Ans: पोलिसांनी दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.






