Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट शिक्षिकेच्या नावाने अल्पवयीन मुलींचे अर्धनग्न फोटो मागवले, WhatsApp मेसेजमुळे खळबळ, पालकांची फसवणूक

नागपूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत शिकणाऱ्या सहावी ते आठवी वर्गातील मुलींच्या पालकांना WhatsApp वर एक मॅसेज आल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं काय प्रकरण आहे बघुयात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 14, 2025 | 08:00 AM
nagpur (फोटो सौजन्य: pinterest )

nagpur (फोटो सौजन्य: pinterest )

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर  शहरातील महाल परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या सहावी ते आठवी इयत्तेतील मुलींच्या पालकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून आलेल्या एका मेसेजमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बनावट शिक्षिकेच्या नावाने शैक्षणिक कामाच्या बहाण्याने मुलींचे आधी पासपोर्ट फोटो आणि नंतर अर्धनग्न फोटो मागितल्याचा विकृत प्रकार समोर आला आहे.

कोल्हापुरात चोरट्यांचा हैदोस, एकाच रात्री 5 घरे फोडली; तब्बल लाखो रुपयांचा ऐवज चोरला

शैक्षणिक कामाची बतावणी

या प्रकरणात आरोपीने शाळेतील शिक्षिका असल्याचे भासवून व्हॉट्सअ‍ॅपवरून पालकांशी संपर्क केला. सुरुवातीला म्हणे शैक्षणिक कामासाठी पासपोर्ट साईझ फोटो पाठवण्याची विनंती करण्यात आली. काही पालकांनी खातरजमा न करता हे फोटो पाठवले.

शासकीय योजनेसाठी विकृत मागणी

थोड्याच वेळात त्याच क्रमांकावरून आलेल्या पुढील संदेशाने पालक हादरून गेले. यात सांगण्यात आले की, एका शासकीय योजनेसाठी मुलींचे अर्धनग्न फोटो आवश्यक आहेत. या विकृत मागणीने पालकांना शंका आली आणि त्यांनी शाळेच्या प्रशासनाशी थेट संपर्क साधला. चौकशीत हे लक्षात आले की शाळेच्या वतीने कोणतीही अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही.

१५ ते १६ पालक ठरले फसवणुकीचे बळी

प्राथमिक तपासात १५ ते १६ मुलींच्या पालकांनी या बनावट क्रमांकावर फोटो पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे अनेक कुटुंबांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पालकांनी तात्काळ याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर कायद्यासह भारतीय दंड संहितेतील विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचा तपास सुरू केला असून सायबर तज्ज्ञांच्या सहाय्याने मेसेजेसचा स्रोत शोधला जात आहे.या प्रकारामुळे संपूर्ण नागपूर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला शोधून कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे. पालकांनी अधिक सजग आणि दक्ष राहणे हीच अशा घटनांपासून संरक्षणाची पहिली पायरी आहे.

Ichalkaranji Crime: विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

Web Title: Half naked photos of minor girls were requested in the name of a fake teacher whatsapp message caused a stir parents were cheated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • crime
  • Crime in Nagpur
  • Nagpur

संबंधित बातम्या

ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी, समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात
1

ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी, समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना
2

Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले
3

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू
4

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.