crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
गुरुग्राम येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मॅनेजिंग डायरेक्टरने शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेवर विषय बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पण तिने नकार देताच तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तिचा विनयभंग करायला सुरुवात केली. “आज तुला मला खुश करावं लागेल”. असे म्हणत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
तक्रारीत काय?
शाळेचे एमडी लव मोहन यांनी तिला होम सायन्स ऐवजी FMM विषय शिकवण्याचा दबाव आणला. तिने नकार दिल्यावर तिला त्रास द्यायला सुरुवात झाली. एमडी आणि त्याच्या पीएने मला केबिनमध्ये बोलावलं होतं. मला म्हणाले, आज तुला मला खुश करावं लागेल. त्यांनी मला पकडलं, माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. मी जोरात ओरडले त्यांना ढकलून देऊन पळू आले, असं पीडित शिक्षिकेने सांगितलंय.
शाळेतून काढून टाकलं
त्यांनतर पीडित शिक्षिका 18 ऑगस्ट 2025 रोजी डिप्रेशनमध्ये गेली. तिची तब्येत खालावली. ति वैद्यकीय रजा घेऊन गुरुग्रामला घरी परतली. नंतर शिवमने तिला रविवारी बोलावले आणि शाळा मालकालाही बोलावले. ती आपल्या पतीसोबत शाळेत गेली. तिथे तिच्या उर्वरित पगाराचा हिशोब देऊन तू आमचं काही बिघडवू शकत नाहीस, असं सांगण्यात आलं. आमचा या भागात दबदबा आहे. तुझी इथे तक्रार करण्याची लायकी नाही. एवढं सांगून तिला शाळेतून काढून टाकण्यात आलं.
एफआयआर दाखल
या प्रकरणी बोलताना पोलीस इन्स्पेक्टर देवेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफआयआर मैनपुरीच्या दन्नाहार पोलीस ठाण्यात पाठवली आहे. पुढील कारवाई मैनपुरी पोलीस करतील. मात्र मैनपुरीचे एसपी सिटी संतोष कुमार सिंह यांनी सांगितले – अजून FIR मिळालेली नाही. मला प्रत मिळाल्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल.
पीडित शिक्षिका मूळची गुरुग्रामची
पीडित शिक्षिका मूळची हरियाण्यातील गुरुग्राम जिल्ह्यातील आहे. शिक्षिकेने 19 जानेवारी 2025 रोजी तिने 32,500 रुपये पगारावर शाळेत नोकरी स्वीकारली होती. आपल्या मोठ्या मुलीच्या शिक्षणासाठी देखील हीच शाळा निवडली होती. शाळा प्रशासनाने तिला आणि तिच्या दोन्ही मुलींना मुलांच्या वसतिगृहाच्या ग्राउंड फ्लोरवर एक रुम उपलब्ध करुन देण्यात आली होती.