Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana crime: चार खून… तीच आरोपी! सुंदर चिमुकल्यांबद्दल मत्सर; 32 वर्षीय वर्षीय पूनम कशी बनली सायको किलर

हरियाणात 32 वर्षीय पूनमने सुंदर मुलांबद्दलच्या मत्सरातून सलग 4 चिमुकल्यांची हत्या केली. तीन वर्षांचा स्वतःचा मुलगाही बळी. पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या. चौथ्या प्रकरणानंतर पोलिस तपासात धक्कादायक सत्य उघड.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 04, 2025 | 03:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • हरियाणात चार मुलांच्या सलग हत्यांनी राज्य हादरले
  • आरोपी पूनम (32) हिने मुलांच्या सौंदर्यावरून मत्सरातून चार हत्या केल्याची कबुली
  • हत्यांसाठी घरातील पाण्याच्या टाकीचा वापर
हरियाणा: पानिपत आणि सोनिपत या दोन जिल्ह्यांमध्ये चार चिमुकल्याच्या हत्येने हरियाणा हादरून गेला आहे. आधी या हत्येला अपघात समजला जात होतं, मात्र पोलीस तपासात हे अपघात नसून हत्या असल्याचं समोर आलं. सलग चार चिमुकल्यांची हत्या एकाच महिलेने केली होती. तिने आपल्या स्वतःच्या मुलाचा देखील जीव घेतला. तिला हत्या करण्यामागचं कारण विचारलं तेव्हा तिने मत्सरातून ही हत्या केल्याचे सांगितले. मत्सर म्हणजे ईर्ष्या, द्वेष, असुरक्षितता, भीती आणि संशय असे आहे. या थरारक हत्याकांडाने राज्य हादरून गेला आहे. नेमकं काय घडलं? तिच्या मनात हे मत्सर कधी पासून निर्माण झाले? अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या?

Chhatrapati Sambhajinagar: गुन्हा दाखल होऊनही गौण खनिजावर माफियांचा डल्ला! डोंगर पोखरण्याचे काम सुरूच, प्रशासन कुठे?

नेमकं काय घडलं?

आरोपी महिलेचं नाव पूनम (३२ वर्ष) असे आहे. पहिल्या बाळाच्या जन्मानंतर घरातील काही मंडळी तिचा मुलगा इतर मुलांइतकं सुंदर नसल्याचं म्हणत होती. या टोमण्यांनी तिच्या मनातनं कमीपणाची भावना खोलवर पक्की झाली. हळूहळू ही भावना मत्सर, चीड आणि अखेरीस हिंसक प्रवृत्ती मध्ये बदलली आणि याच मत्सरातून तिने पहिल्या दोन हत्या २०२३ मध्ये केल्या. शुभम (वय 3 वर्षे) असे तिच्या स्वतःच्या मुलाचे नाव तर इशिका (वय 9 वर्षे) असे नंदीच्या मुलीचे नाव आहे. दोघांनाही तिने घराच्या पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं. दोन्ही मृत्यू अपघात म्हणून कुटुंबीयांनी स्वीकारल्याने कोणीही शंका घेतली नाही. 2023 मध्ये पूनम भावड गावातील सासरी होती.

नंतर तिने ऑगस्ट 2025 मध्ये तिसरी हत्या केली. तिने आपल्या चुलत भावाच्या मुलीला यावेळेस टार्गेट केलं. पूनम आपल्या माहेर म्हणजे सिवाह गावात राहत असतांना जिया (वय 6 वर्षे) हिला पाण्याच्या टाकीत ढकलून बुडवून मारलं. काहींना संशय देखील आला होता. मात्र पुरावे नसल्याने गोष्ट दाबून टाकण्यात आली.

यानंतर चौथी हत्या तिने 1 डिसेंबर 2025 मध्ये केली. तिने यावेळेस टार्गेट विधी (वय 6 वर्षे) हिला केलं. ती जेव्हा नौल्था गावात नातेवाईकांच्या लग्नासाठी गेली असता तिने विधीची प्लास्टिकच्या टबात तिची मान दाबून तिची हत्या केली. तिने प्लास्टिकच्या टब आधी छतावरील स्टोअररूममध्ये नेला आणि तिथे हत्या केली. नंतर दरवाजाला बाहेरून कुलूप लावून ती खाली उतरली. तिला नातेवाईकांनी स्वतःच्या भिजलेल्या कपड्यांबद्दल विचारले तेव्हा स्वतःच्या भिजलेल्या कपड्यांबद्दल खोट्या कहाण्या सांगत राहिली. नंतर नातेवाईकांना विधी सापडली नाही. कुटुंबीयांनी खूप शोध घेतला तेव्हा अखेर ती स्टोअररूममध्ये सापडली. तेव्हा तिचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. टब आधी बाथरूममध्ये असतो, तो स्टोअररूममध्ये कसा आला, हा पहिला मोठा पुरावा ठरला. त्यांनतर एकेकाची चौकशी केली आणि अखेर कडक प्रश्नांना पूनम खचली आणि तिने चारही मुलांच्या हत्येची कबुली दिली.

धक्कादायक खुलासा?

पानीपत पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशीत पूनमने धक्कादायक खुलासा केला आहे. तिला मुलींच्या सौंदर्यामुळे प्रचंड हेवा वाटायचा. आश्चर्याची बाब म्हणजे, तिने ज्या चार मुलांना मारलं त्यात तिचा स्वतःचा तीन वर्षांचा मुलगाही होता. पोलिसांनी सांगितलं की, संशय आपल्यावर येऊ नये म्हणून तिने मुलींबरोबरच स्वतःच्या मुलालाही मारलं. पूनमने हत्या करण्यासाठी घरातील पाण्याच्या टाक्यांचा वापर केला. पाणी हेच सर्वात सोपं आणि निःशब्द माध्यम असल्याचं तिला वाटायचं. बळी पूर्णपणे बुडला आहे याची खात्री करण्यासाठी ती बारीक लक्ष ठेवत असे, ज्यामुळे मृत्यू निश्चित होई. तपासात पुढे आलं की, तिच्या लक्ष्यावर कुटुंबातील आणखी दोन मुलं होती, ज्यात तिचा केवळ 18 महिन्यांचा दुसरा मुलगाही होता.

तंत्रिकांशी संबंध

सोनीपत येथील सासरच्या लोकांनी वेगळीच कहाणी सांगितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पूनम अनेकदा आपला आवाज बदलून एखाद्या पुरुष आत्म्याने आपल्यात प्रवेश केल्याचा दावा करायची. “मी तीन मुलांना मारलंय” असं ती कधी कधी सांगत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय पूनमचा संपर्क उत्तर प्रदेशातील कैरान्यातील एका तांत्रिकाशीही असल्याचं तपासात समोर आलं.

कारवाई सुरु?

पोलिसांनी पूनमला अटक केली आहे. जिया हिचा मृत्यू अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पानीपतच्या औद्योगिक ठाणे सेक्टर 29 मध्ये हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पूनमवर आता चारही हत्या प्रकरणांत कठोर कारवाई सुरू आहे.

Solapur News: रुग्णालयातही महिला असुरक्षित; X-ray च्या नावाखाली गर्भवती महिलेशी गैरकृत्य, टेक्निशियन निलंबित

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे आणि किती हत्यांची कबुली दिली?

    Ans: आरोपी पूनम (32) हिने चार चिमुकल्यांच्या हत्यांची पोलिसांसमोर कबुली दिली.

  • Que: हत्या कशी केली जात होती?

    Ans: तिने मुलांना पाण्याच्या टाकीत/टबात बुडवून मारल्याचे तपासात उघड.

  • Que: तिच्या वागण्यामागचे कारण काय सांगितले जाते?

    Ans: सुंदर मुलींविषयी मत्सर, कमीपणाची भावना आणि मानसिक स्थिती बिघडल्यामुळे हे कृत्य केल्याचा दावा.

Web Title: Hariyana crimhow 32 year old poonam became a psycho killer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: गुन्हा दाखल होऊनही गौण खनिजावर माफियांचा डल्ला! डोंगर पोखरण्याचे काम सुरूच, प्रशासन कुठे?
1

Chhatrapati Sambhajinagar: गुन्हा दाखल होऊनही गौण खनिजावर माफियांचा डल्ला! डोंगर पोखरण्याचे काम सुरूच, प्रशासन कुठे?

Pune Crime: पुरुषावर अत्याचारानंतर आता खंडणीप्रकरणातही अडचणीत; गौरी वांजळेवर दुसरा गुन्हा दाखल
2

Pune Crime: पुरुषावर अत्याचारानंतर आता खंडणीप्रकरणातही अडचणीत; गौरी वांजळेवर दुसरा गुन्हा दाखल

Solapur News: रुग्णालयातही महिला असुरक्षित; X-ray च्या नावाखाली गर्भवती महिलेशी गैरकृत्य, टेक्निशियन निलंबित
3

Solapur News: रुग्णालयातही महिला असुरक्षित; X-ray च्या नावाखाली गर्भवती महिलेशी गैरकृत्य, टेक्निशियन निलंबित

Supreme Court : लपूनछपून महिलांचे फोटो काढल्यास आता…सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, गुप्तपणे फोट काढणे पडेल महागात
4

Supreme Court : लपूनछपून महिलांचे फोटो काढल्यास आता…सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, गुप्तपणे फोट काढणे पडेल महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.