कँटीनमध्ये 74 लाखांचा अपहार, हवालदाराला ठोकल्या बेड्या; ‘असा’ झाला प्रकार उघडकीस
नेमकं प्रकरण काय?
सोलापूर महापालिकेच रामवाडी आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृह आहे. या ठिकाणी अनेक गर्भवती महिला एक्स रे काढण्यासाठी येतात. या ठिकाणी पीडित महिला एक्स रे काढण्यासाठी आली होती. तिने सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तीन एक्स रे रूममध्ये गेली. तिथं गुरुप्रसाद इनामदार नावाचा टेक्निशिअन होता. तोच एक्स रे मशिन ऑपरेट करत होता. त्यावेळी या टेक्निशिअनच्या मनात वाईट विचार आले. त्याने एक्स रे काढण्याच्या नावाखाली या महिलेच्या मनाला लज्जा वाटेल असे गैरकृत्य केलं.
गर्भवती महिला या गैरकृत्याने हादरून गेली. तिने प्रसंगावधान राखत तिथून काढता पाय घेतला. या थेट आपला घर गाठला. या घटनेने ती घाबरली. पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यांनी घडलेला सगळा प्रकार पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या कानावर घातला. एवढेच नाही तर याबाबतची तक्रार ही केली. घडलेला प्रकार हा गंभीर असल्याने तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले. ही चौकशी आरोग्य विभागाने वेगाने केली. या चौकशीचा अहवाल त्याच वेगाने महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला. अहवालावरून संबंधीत कर्मचारी गुरुप्रसाद इनामदार याला तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.
अश्या घटना जर आरोग्य केंद्रात होत असतील, जिथं महिलांना उपचार व सुरक्षिततेची हमी दिली जाते, तर हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रश्न आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. लहान चिमुकली असो किंवा मुलगी, आई असो किंवा आजी महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालले आहे. महिला आपल्या कामाच्या ठिकाणी, मुली शाळेत, प्रवास करतांना, सार्वजनिक ठिकाणी असो किंवा आपल्या घरीच कुठेच महिला सुरक्षित नाही आहे. आता रुग्णालयात असा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षितेचा प्रश ऐरणीवर आला आहे.
स्कूल बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी; संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Ans: सोलापूर महापालिकेच्या रामवाडी आरोग्य केंद्रात.
Ans: एक्स-रे काढण्यासाठी ती रुग्णालयात आली होती.
Ans: चौकशी अहवालानंतर टेक्निशियनला तातडीने निलंबित करण्यात आले.






