
crime (फोटो सौजन्य: social media)
हरियाणा : हरियाणाच्या गुरुग्राम मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणणे आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आपल्या बॉसची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती ही आरोपी तरुणावर त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत आपली मैत्री करून देण्यासाठी दबाव आणत होता. याला वैतागून त्याने आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून बॉसची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून गुन्हा कबूल केला आहे.
कारण काय?
या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव सोनपाल आहे. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील मथुरेचा रहिवासी होता. तो कामाच्या निमित्ताने गुरुग्राममधील खोह गावात भाड्याच्या घरात राहत होता. सोनपाल मानेसरमधील इंडस्ट्रियल मॉडेल टाउनशिप (IMT) मध्ये असलेल्या एका खाजगी कंपनीत काम करत होता. हत्येतील मुख्य संशयित आरोपी हा त्याच कंपनीत एक जुनिअर कर्मचारी म्हणून कार्यरत होता. बॉसला आरोपीच्या लिव्ह-इन पार्टनरशी मैत्री करण्याची इच्छा होती म्हणून रागाच्या भरात त्याने बॉसची हत्या करण्याचा कट रचला.हत्या करणाऱ्या आरोपींची नावे कुशलपाल सिंग उर्फ कौशल (26) अशी आहे तर लिव्ह-इन पार्टनर भावना (19) अशी आहे.
आरोपी अटकेत
कौशल हा उत्तरप्रदेश येथील गोंडा जिल्ह्यातील कैमथल गावचा रहिवासी आहे. तर भावना हि कासगंजमधील प्रल्हादपूर गावची रहिवासी आहे. पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून दोन्ही आरोपी आयएमटी मानेसरच्या सेक्टर 1 मधील एका घरात एकत्र राहत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
तापाच्या बहाण्याने नवऱ्याला माहेरी बोलावलं, नंतर प्रियकरासह गळा आवळून केली हत्या
हरियाणातील फरीदाबादच्या एनआयटी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा आवळून ठार मारल्याचे उघड झाले आहे. तापाने फणफणलेल्या नवऱ्याला उपचाराच्या बहाण्याने माहेरी बोलावून तिथेच या भयंकर कृत्याची अंमलबजावणी करण्यात आली. पोलिसांनी आरोपी पत्नी पूनमला अटक केली असून, तिने आपला गुन्हा कबूल केला आहे.
Ans: गुरुग्राम
Ans: बॉस
Ans: लिव्ह-इन