कर्जत: कर्जतमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आधी चिमुरड्याचा नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र एक गुप्त माहिती आणि पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आणि समोर आले भयंकर कारण. नेमकं काय घडलं, प्रकरण काय आहे? जाणून घ्या.
काय नेमकं प्रकरण?
ही घटना कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी येथील आहे. आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जयवंता हिने स्वतः हत्येची कबुली दिली. जयदीप गणेश वाघ असं मृत चिमुकल्याचा नाव आहे. जयदीप याचे वडील गणेश वाघ आणि पत्नी पुष्पा हे दोघे ९ नोव्हेंबरला मजुरीसाठी गेले होते. त्यांची दोन्ही मुलं घरासमोर खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या जयवंता हिने जयदीपला उचलून घराच्या मागे नेलं आणि गळा आवळून त्याची हत्या केली. यांनतर मुलगा बेशुद्ध झाल्याचं नाटक करीत नैसर्गिक मृत्यू झाल्याचा आभास निर्माण केला. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यांनतर कुटुंबाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
Dhule Crime: हृदयद्रावक! आईने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण काय?
का केली हत्या?
मात्र एका नागरिकाने पोलिसांना गुप्त माहिती दिली आणि भयंकर प्रकार उघडकीस आला. गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी मुलाचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये मुलाची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. जयवंता हिनेही आपला गुन्हा मान्य केला आहे. शेजारची मुलं माझ्या मुलांना मारतात म्हणून मी त्याला मारलं अशी धक्कादायक कबुली जयवंता हिने दिली आहे.
आधी बहिणीला देखील मारण्याचा केला प्रयत्न
धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी जयवंताने चिमुरड्याच्या ४ वर्षांच्या मोठ्या बहिणीलाही मारण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसला आणि दुसऱ्या दिवशी तिने अडीच वर्षांच्या जयदीपची अत्यंत निघृणपणे हत्या केली. पोलिसांनी जयवंता हिला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई सुरु आहे.
धक्कादायक ! भोंदूबाबाने केला महिलेवर तब्बल 14 वर्षे अत्याचार; 50 लाखांचीही केली फसवणूक
Ans: जयवंता
Ans: शवविच्छेदन
Ans: कर्जत






