Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवले नंतर ‘ती’ गर्भवती राहिली, पण…; महिलेची पोलिसात तक्रार दाखल

गुरुग्राममधून एक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिला शिक्षिकेने एका तरुणावर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 30, 2025 | 06:20 PM
लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवले नंतर 'ती' गर्भवती राहिली, पण...; महिलेची पोलिसात तक्रार दाखल (फोटो सौजन्य-X)

लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवले नंतर 'ती' गर्भवती राहिली, पण...; महिलेची पोलिसात तक्रार दाखल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

हरियाणातील गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एक विधवा महिला शिक्षिका भाड्याच्या घरात राहत होती. काही काळानंतर महिला त्या मुलाच्या संपर्कात राहीली आणि काही दिवसात त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. या प्रेमसंबंधानंतर तरुणाने महिलेला लग्न करण्याचे वचन दिले नंतर दोघांनीही प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पण काही काळानंतर त्या मुलाने त्याचे खरे रंग दाखवले. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया…

गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागातून सापळा रचून पकडले

नेमकं काय आहे प्रकरण?

पीडित महिलेने आरोप केला आहे की, ती भोंडसी येथे तिच्या मुलासोबत भाड्याच्या घरात राहते. ती एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. तिच्या पतीचे निधन झाले होते. शाळेत काम करत असताना तिची भेट मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील अजित प्रताप सिंह कुशवाहा याच्याशी झाली, जो भोंडसीच्या भवानी एन्क्लेव्हमध्ये राहत होता.

२०२१ मध्ये हळूहळू दोघांमध्ये संवाद सुरू झाला. नंतर जेव्हा मैत्री जवळीकतेत बदलू लागली, तेव्हा अजितने तिला लग्न करण्यास सांगितले. दोघेही फिरायला लागले. ६ नोव्हेंबर २०२१ रोजी अजितने आजारी असल्याचे कारण देत पीडितेला त्याच्या अकादमीत बोलावले. तिथे त्याने कोल्ड्रिंकमध्ये नशा मिसळून ते पीडितेला दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. विरोध केल्यावर अजित म्हणाला की, आपण लग्न करणार आहोत. त्याने तिला खोटे आश्वासन दिले. मात्र, नंतर अजितने लग्न करण्यास नकार दिला आणि पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि ब्लॅकमेलिंग सुरू केले.

जेव्हा ती गर्भवती राहिली…

२०२२ मध्ये, अजितने पीडितेवर तिच्या मुलाला तिच्या आजी-आजोबांच्या घरी सोडण्यासाठी दबाव आणला, जो तिने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतरही अजितने ब्लॅकमेल करून एक लाख रुपये उकळले आणि तिला दररोज मारहाण करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०२४ मध्ये पीडिता गर्भवती राहिल्यावर, अजितने खोटे बोलले आणि तिला गोळ्या दिल्या, ज्यामुळे गर्भपात झाला. त्रासलेल्या पीडितेने २१ नोव्हेंबर २०२४ रोजी अजितचा भाऊ सिद्ध प्रताप याला फोन करून तिच्यावरचा प्रसंग सांगितला आणि भवानी एन्क्लेव्ह येथील त्याच्या घरी जाऊन मदत मागितली. सिद्ध प्रतापनेही तिचे लग्न करण्यास नकार दिला.

२० जानेवारी २०२५ रोजी पीडितेने ११२ वर फोन करून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अजित आणि सिद्ध प्रतापला इशारा दिला, परंतु नंतर अजितने तिला पुन्हा धमकावण्यास सुरुवात केली. भीतीमुळे पीडितेने सुरुवातीला तक्रार केली नाही आणि शाळाही सोडली. त्यानंतर तिने भोंडसी पोलिसात तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहे.

Delhi Crime: हॉटेलच्या बेडवर ४० वर्षीय पुरूषाचा मृतावस्थेत आढळला, तर २६ वर्षीय प्रेयसी फरार; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Haryana gurgaon widow woman fell in love with young boy mother of one children now secret is out shocking bizarre news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • police

संबंधित बातम्या

Jharkhand Crime: झारखंड हादरले! प्रेयसीसाठी पत्नीचा खून; मृतदेह लपवण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरले
1

Jharkhand Crime: झारखंड हादरले! प्रेयसीसाठी पत्नीचा खून; मृतदेह लपवण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरले

Nagpur Crime: प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी
2

Nagpur Crime: प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी

Dhule Crime: धुळ्यात तुफान दगडफेक आणि गोळीबार! शीख धर्मियांच्या दोन गटात तुफान राडा, कारण काय?
3

Dhule Crime: धुळ्यात तुफान दगडफेक आणि गोळीबार! शीख धर्मियांच्या दोन गटात तुफान राडा, कारण काय?

Latur Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी, फोटोग्राफरकडून वारंवार अत्याचार; 16 वर्षीय अनाथ मुलीने उचलला टोकाचा पाऊल
4

Latur Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी, फोटोग्राफरकडून वारंवार अत्याचार; 16 वर्षीय अनाथ मुलीने उचलला टोकाचा पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.