Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Shetti: राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा

Raju Shetti: राजू शेट्टी यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. किणी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा देत राजू शेट्टी यांना पोलिसांकडून १६८ ची नोटीस बजावण्यात आली आहे. आंदोलनामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ही खबरदारी घेतली

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 03, 2026 | 12:02 PM
राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा

राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटिस
  • किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा
  • ६८ ची नोटीस बजावली
राजेंद्र पाटील, कोल्हापूर : ऊसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा आणि दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी शेट्टी यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावली आहे. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Raju Shetti)

कारवाईचा इशारा

आज मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी टोल नाका येथे समर्थक आणि कार्यकर्त्यांसह चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी ही नोटीस बजावली. रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी ही कारवाईची नोटीस लागू केली.

Washim Ganja Farming Case: ७० वर्षीय शेतकऱ्याच्या शेतात सुरू होता अवैध धंदा; पोलिसांनी टाकली धाड आणि…

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या २७ ऑक्टोबर रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) आणि ३७ (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशांचा आधार घेत पोलिसांनी शेट्टी यांना नोटीस दिली आहे.

नोटीस न्यायालयात पुरावा

नोटीसमध्ये आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागण्या सनदशीर मार्गाने मांडाव्यात, असेही पोलिसांनी बजावले आहे. आंदोलनादरम्यान शेट्टी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना सर्वस्वी जबाबदार धरले जाईल आणि नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

मात्र, पोलिसांची नोटीस बजावण्यात आल्यानंतरही राजू शेट्टी यांनी आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवल्याने आज ३ नोव्हेंबर रोजी किणी टोल नाक्यावर नेमके काय घडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Mhada News: मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! लोअर परळ बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना ६ नोव्हेंबरला हक्काची घरे

Web Title: Raju shetty protest kini toll plaza police notice section 168 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • police
  • Raju Shetti
  • Traffic

संबंधित बातम्या

IPS Officers Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ IPS-RPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ अधिकाऱ्यांना मुदतवाढ
1

IPS Officers Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ IPS-RPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ अधिकाऱ्यांना मुदतवाढ

Satara District Court: मोठी बातमी! जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी! ई-मेलमुळे खळबळ; न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांची धावपळ
2

Satara District Court: मोठी बातमी! जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी! ई-मेलमुळे खळबळ; न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांची धावपळ

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श
3

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा
4

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.