Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: हातकणंगलेत धनबाद एक्स्प्रेसची धडक; इयरफोन लावून रुळावरून चालणाऱ्या १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

इयरफोन लावून मोबाईलवर बोलत रेल्वे रुळावरून चालत असलेल्या १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला मागून आलेल्या धनबाद एक्स्प्रेसची धडक बसली. मैत्रिणींनी आरडाओरडा करून सावध करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 24, 2026 | 11:30 AM
Accident News: हातकणंगलेत धनबाद एक्स्प्रेसची धडक; इयरफोन लावून रुळावरून चालणाऱ्या १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Accident News: हातकणंगलेत धनबाद एक्स्प्रेसची धडक; इयरफोन लावून रुळावरून चालणाऱ्या १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • धनबाद एक्स्प्रेसची १७ वर्षीय तरुणीला धडक
  • इयरफोनमुळे ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नाही
  • हातकणंगले पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
 

इचलकरंजी : कानात इयरफोन घालून मोबाईलवर बोलत रेल्वे रुळावरून चालत असलेल्या १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा धनबाद एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. इचलकरंजी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी हातकणंगले रेल्वे स्थानकाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मैत्रिणींसोबत रुळावरून चालत होती

अनुष्का बुधवारी सकाळी दोन मैत्रिणींसोबत हातकणंगले परिसरात आली होती. सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिघी हातकणंगले रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळावरून चालत जात होत्या. त्यावेळी अनुष्काच्या कानात इयरफोन होते आणि ती मोबाईलवर बोलत होती. त्याचवेळी मागून धनबाद एक्स्प्रेस येत होती.

हेही वाचा: वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

मैत्रिणींनी केला सावध करण्याचा प्रयत्न

धनबाद एक्स्प्रेस जवळ येत असताना तिच्या मैत्रिणींचे लक्ष ट्रेनकडे गेले. त्यांनी अनुष्काला रुळावरून बाजूला होण्याचा इशारा केला. तसेच आरडाओरड करून तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इयरफोन लावलेले असल्याने आणि ती मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याने तिला ट्रेनचा हॉर्न किंवा मैत्रिणींचा आवाज ऐकू आला नाही. काही क्षणांतच ट्रेन तिच्याजवळ पोहोचली.

धडकेत रुळाबाहेर फेकली

धनबाद एक्स्प्रेसची अनुष्काला जोरदार धडक बसली. या धडकेत ती रुळाबाहेर फेकली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर तिच्या मैत्रिणींनी तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत तिला उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा: Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

उपचारापूर्वीच मृत्यू

रुग्णालयात डॉक्टरांनी अनुष्काची तपासणी केली. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे अनुष्काच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या मैत्रिणींनाही मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Hatkanangale dhanbad express accident 17 year old girl dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Hatkanangale
  • Ichalkaranji News
  • Kolhapur Crime
  • Railway Accident News

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर…’; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण
1

Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर…’; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.