Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

पुण्यातील गणेशोत्सवादरम्यानच्या १० दिवसांच्या दारूबंदी आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानूसार सुधारित आदेश काढण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 28, 2025 | 12:02 PM
पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या 'त्या' आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या 'त्या' आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मध्यभागातील म्हणजेच खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात दारू आणि वाईन शॉपीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश देखील पारित केले होते. मात्र, निवडक दारूबंदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने हा आदेश फेटाळत स्थगिती दिली. त्यामुळे आता मध्यवर्ती भागातील दुकाने पूर्ण दहा दिवस बंद राहणार नाहीत. त्यानूसार सुधारित आदेश काढण्यात आला आहे.

गणेशोत्सव पुण्याचा आत्मा मानला जातो. या काळात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात, तर मिरवणुकीच्या दिवशी गर्दी प्रचंड वाढते. अशावेळी दारूच्या नशेत गोंधळ, भांडणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचणाऱ्या घटना घडू नयेत, यासाठी दरवर्षी काही ठराविक दिवशी दारूबंदी लागू केली जाते. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागात ही दारूबंदी असते. त्यानुसार यंदा शहरासह जिल्ह्यात गणेश आगमन आणि विसर्जन तसेच इतर काही महत्वाच्या दिवशी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तर, मध्यवर्ती भागातील तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत दारू विक्री बंद केली होती. मात्र, याबाबत संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता मध्यवर्ती भागातील दुकाने संपूर्ण दहा दिवस बंद राहणार नाहीत.

मद्य विक्रीवरील निर्बंध पुण्यातील मध्यवर्ती भागासाठी कायम राहणार आहेत. २७ ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थी आणि ६ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशी या दोन्ही दिवशी संपूर्ण जिल्ह्यात ड्राय डे जाहीर केला आहे. तसेच ७ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन पार पडते, त्या क्षेत्रातील मिरवणुकीच्या मार्गावरील दुकाने मिरवणुकीदरम्यान बंद ठेवण्याचे आदेशही लागू आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी देखील २६ ऑगस्ट रोजी सुधारित आदेश पारित केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशात काय?

  • ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) – संपूर्ण पुणे जिल्हा
  • ७ सप्टेंबर (विसर्जन) – पीएमसी क्षेत्रातील मिरवणूक मार्गावरील दुकाने बंद
  • ५ वा व ७ वा दिवस – विसर्जन होणाऱ्या भागातील मार्गावरील दुकाने बंद
  • खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलीस हद्द – २७, ३१ ऑगस्ट, २, ६ सप्टेंबर पूर्ण दिवस व ७ सप्टेंबर मिरवणूक संपेपर्यंत बंद

Web Title: High court stays liquor ban order during ganesh chaturthi in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Ganesh Utsav 2025
  • pune news

संबंधित बातम्या

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारही झाल्या सहभागी
1

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारही झाल्या सहभागी

जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ; विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी
2

जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ; विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी

जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा
3

जल्लोषपूर्ण वातावरणात भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा

सह्याद्री हॉस्पिटलचा यकृत प्रत्यारोपण परवाना स्थगित; रुग्णांचा मृत्यू झाल्याने घेण्यात आला निर्णय
4

सह्याद्री हॉस्पिटलचा यकृत प्रत्यारोपण परवाना स्थगित; रुग्णांचा मृत्यू झाल्याने घेण्यात आला निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.