crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेशमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचं अर्धवट जळालेला मृतदेह आढळला असल्याचे समोर आले आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून तीच नाव अंशिका असे आहे. ती केवळ २४ वर्षांची आहे. तीच २४ सप्टेंबरला लग्न होत. पण लग्नाच्या आधल्या दिवशीच तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
अंशिकाने आधी प्रेमविवाह केला. कोर्टात तीच लग्न झालं होता. परंतु एका वर्षातच तीच घटस्फोट झाला. आता २४ सेप्टेंबर २०२५ ला अंशिकाचं पुन्हा लग्न होता. परंतु लग्नाच्या आधीच तिच्या सोबत दुर्दैवी घटना घडली. ही घटना हिमाचल प्रदेश येथील आहे. नेमकं काय घडलं आंशिक सोबत? चला जाणून घेऊया.
कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…
नेमकं काय घडलं?
अंशिकाची भेट प्रवेश कुमार याच्यासोबत झाली. प्रवेश कुमार हा भारतीय सैन्यात नोकरी करत होता. त्यांची मैत्री वाढत गेली. त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांचं प्रेम लवकरच फुलत गेलं. एकमेकांवर नि:स्वार्थी प्रेम आणि एकत्र जगण्या- मरण्याची शपथ घेऊन त्यांनी 2023 मध्ये कोर्टात लग्न केलं. परंतु त्यांच्या कुटुंबीयांचा या नात्याला नकार होत. लग्नानंतर कुटुंबीयांमध्ये वाद आणि तणाव वाढत गेला. याच कारणामुळे दोघांच्याही नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला. आणि या दुराव्याचं रूपांतर घटस्फोटात झाला. २०२४ मध्ये त्यांचं परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. एका वर्षातच या दोघांचं घटस्फोट झाला.
घटस्फोट झाल्यानंतर लग्न
परंतु घटस्फोट झाल्यानंतरही अंशिका आणि प्रवेश एकमेकांपासून दूर राहू शकले नाहीत. ते म्हणतात ना कितीही जरी दोघांमध्ये दुरावा असला तरी प्रेम असतंच. तसाच काहीस घडलं अंशिका आणि प्रवेश सोबत. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम तसंच राहील. म्हणूनच, मे 2025 मध्ये त्यांनी पुन्हा कोर्टात लग्न केलं. यावेळी, त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू कुटुंबियांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज कमी होऊ लागले. अखेर, सर्वांनी 24 सप्टेंबर रोजी अंशिका आणि प्रवेश यांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. अंशिकासाठी हा क्षण खूप खास होता.
अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह
पण लग्नाच्या आधीच नियतीने काही वेगळच केलं. २२ सेप्टेंबरला रात्री, प्रवेश हा जम्मूवरून घरी परतला. त्यावेळी प्रवेशच अंशिकाशी फोनवर बोलणं झालं. या बोलण्यातून, अंशिका गर्भवती असल्याचं त्याला कळलं. प्रवेशाच्या काका संजीव कुमार यांना अद्यापही या नात्याला घेऊन नाराज होते. त्यांना प्रवेश आणि अंशिकाचं लग्न मान्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी २३ सप्टेंबर रोजी अचानक तिच्या घरापासून 500 मीटर अंतरावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. आनंदाच्या वातावरणात एकदम शोककळा पसरली.
पोलीस तपास सुरु
याबाबतीत पोलिसांना कळवण्यात आलं. अंशिकच्या आईने प्रवेश आणि त्याच्या काकांवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी ताबडतोब संजीवला ताब्यात घेतलं, परंतु प्रवेश त्याच्या ड्युटीवर गेला होता. अंशिकाची हत्या नेमकी कोणी आणि का केली? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.