Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू

रामगड-बोकारो रस्त्यावर एक प्रवासी वाहन आणि ट्रक यांची जोरदार धडक झाली, ज्यात ताशा पक्षाचे सदस्य गंभीर जखमी झाले. सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमीला तातडीने रामगड सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2026 | 08:05 AM
दुर्दैवी ! महाराष्ट्राच्या दोन वकिलांचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू; सैन्याच्या वाहनाला दुचाकीची धडक

दुर्दैवी ! महाराष्ट्राच्या दोन वकिलांचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू; सैन्याच्या वाहनाला दुचाकीची धडक

Follow Us
Follow Us:

रामगड : झारखंडच्या रामगड जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली. यामध्ये दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रामगड जिल्ह्यातील राजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लारीजवळ घडला. रामगड-बोकारो रस्त्यावर एक प्रवासी वाहन आणि ट्रक यांची जोरदार धडक झाली, ज्यात बँड-ताशा पथकाचे सदस्य गंभीर जखमी झाले. सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमीला तातडीने रामगड सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील मृतांमध्ये राजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरांगमार्चा येथील रहिवाशांचा समावेश आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

झारखंडमधील राजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लारी-बारलाँगजवळ गुरुवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला. कोळसा वाहून नेणारा ट्रक आणि प्रवासी वाहन यांच्यात समोरासमोर धडक झाली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मृतांच्या कुटुंबीयांचा एकच आक्रोश परिसरात पाहिला मिळाला. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त करण्यासाठी रस्ता रोखून धरला.

बँड-ताशा पथकातील लोकांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बलसागरा आणि मरांगमार्चा गावातील बँड-ताशा पार्टीचे सदस्य एका सार्वजनिक कार्यक्रमातून प्रवासी वाहनातून परतत होते. वाहनात एकूण आठ जण होते. रामगढ-बोकारो महामार्गावर (NH-23) लारी-बारलाँगजवळ, भरधाव वेगाने येणाऱ्या कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकने प्रवासी वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना धडक दिली. धडकेचा आघात इतका भीषण होता की, वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि त्यातील सर्वजण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक ग्रामस्थ, राजरप्पा पोलीस ठाणे आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना तात्काळ रामगढ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सात जणांना मृत घोषित केले, तर एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी रांचीला पाठवण्यात आले. सिव्हिल सर्जन डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले की, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू

Web Title: Horrific accident in jharkhands ramgarh district 7 people died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 07:29 AM

Topics:  

  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.