Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

तसेच स्विफ्ट डिझायर कारमधील गणेश केशव कांबळे (वय ३५), आकाश मोहन कांबळे, विद्या मोहन कांबळे आणि मीनल मोहन कांबळे (सर्व रा. म्हसवड/देवापूर परिसर) हेही जखमी झाले आहेत. जखमींवर म्हसवड येथील संचित हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 27, 2026 | 09:38 AM
म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

Follow Us
Follow Us:

म्हसवड : वडजल (ता. माण) गावच्या हद्दीत वडजल-म्हसवड मार्गावर एच. पी. पेट्रोलपंपाच्या पुढे सुमारे ५०० मीटर अंतरावर शनिवारी (दि.२६) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तीन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात संजय दिनकर पाटील (वय ४८, रा. वडगाव हवेली, ता. कराड; सध्या रा. पलूस, जि. सांगली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोन्ही वाहनांमधील मिळून नऊ जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पाटील हे एमएच-१० एफए-०६२८ क्रमांकाची स्विफ्ट कार चालवत होते. त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत तक्रारदार गणेश रामचंद्र जाधव यांच्या एमएच-१० बीएम-३७३५ क्रमांकाच्या इर्टिगा कारला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या एमएच-४२ एच-७१२१ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर स्विफ्ट कार-इर्टिगा कारच्या समोरील भागावर जोराने आदळल्याने तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात स्विफ्ट कारमधील अर्चना संजय पाटील (वय ३६), हर्षद संजय पाटील (वय १७), अशोक आकाराम सूर्यवंशी (वय ५४), अरुणा अशोक सूर्यवंशी (वय ४३) आणि अंकिता अशोक सूर्यवंशी (वय २१) हे जखमी झाले.

तसेच स्विफ्ट डिझायर कारमधील गणेश केशव कांबळे (वय ३५), आकाश मोहन कांबळे, विद्या मोहन कांबळे आणि मीनल मोहन कांबळे (सर्व रा. म्हसवड/देवापूर परिसर) हेही जखमी झाले आहेत. जखमींवर म्हसवड येथील संचित हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

या प्रकरणी गणेश रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्ह्यातील आरोपी संजय पाटील यांचा अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार डी. पी. खाडे (ब.नं. ३७६) करत असून, म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अपघातानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर, सीसीटीव्ही फुटेज पोलिसा

Web Title: Horrific three car collision near mhaswad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Accident News
  • Satara News

संबंधित बातम्या

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर
1

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
2

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी
3

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
4

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.