crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे येथील मालकाने वेटरचा पगार न दिल्याने वेटरने मालकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी वेटरला अटक केली आहे. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव संतोष शेट्टी आहे (वय 44) असे आहे. तर उमेश दिलीप गिरी (वय 39) असे आरोपीचे नाव आहे.
सख्खा भाऊ बनला पक्का वैरी ! फक्त मुगाच्या शेंगा तोडल्याने धाकट्याने केला मोठ्या भावाचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे इथे घडली आहे.आरोपी उमेश गिरी हा काही महिन्यांपासून त्यांच्या हॉटेलमध्ये काम करीत होता. संतोष शेट्टी यांनी उमेश गिरी याचा पगार न दिल्याने मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपी उमेश गिरीने भटारखान्यातील चाकूने संतोष शेट्टी यांच्यावर सपासप वार केले.
या घटनेत संतोष शेट्टी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी उमेश गिरी करण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याचे उत्तमनग पोलिसांनी सांगितले.
बीड हादरलं! अंबाजोगाई येथील साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
बीडच्या अंबाजोगाई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाईतील साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाची डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली असून, मृत तरुणाचे नाव अविनाश शंकर देवकर (रा. रायगड नगर, अंबाजोगाई) असे आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी पसार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
अंबाजोगाईतील रायगडनगर येथे राहणारा अविनाश शंकर देवकर याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे घडली. अज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. यात डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे अविनाशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. हल्ला इतका अचानक आणि निर्दयी होता की हॉटेल परिसरात काही काळ गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.यानंतर अविनाश देवकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला.या घटनेचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत. ही हत्या नेमकं कोणत्या कारणावरून करण्यात आली आणि अद्याप समजू शकलेले नाही.