crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने सततच्या भांडणाला कंटाळून आपल्या भावाच्या आणि हपणाऱ्या भावजयीच्या मदतीने प्रियकराचा काटा काढल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मृतदेह ब्लांलकेटमध्ये गुंडाळून निर्जनस्थळी फेकून दिला. ही धक्कादायक घटना चाकण एमआयडीसी परिसरातील कडाचीवाडी येथे घडली. पोलिसांनी ४८ तासात तिघांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे.
तीन वर्षांपासूनचा प्रेमसंबंध
प्राथमिक माहितीनुसार, हत्या झालेल्या तरुणाचे नाव मुकेश कुमार (वय २४) असे आहे. अटक झालेल्यांमध्ये आरतीकुमारी बिजलाऊराम उराव (२३), आकाश बिजलाऊराम उराव (२१) आणि बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (२१) या तिघांचा समावेश आहे. तिघेही झारखंड येथील रहिवासी आहेत. आरतीकुमारी आणि मुकेशकुमार यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघेही पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते.
सततच्या त्रासाला कंटाळून
मुकेशकुमार हा वारंवार आरतीकुमारीला मारहाण आणि शिवीगाळ करत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून आरतीकुमारीने आपल्या भावाला आकाशला आणि त्याची होणारी पत्नी बालमुनीला मदतीसाठी बोलावून घेतले.
नेमकं काय घडलं?
२ ऑक्टोबरला रात्री आरतीकुमारी आणि मुकेश यांनी दारू प्राशन केले आहे. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. रंगाच्या भरात आरतीकुमारी, तिचा भाऊ आणि भावजयी यांनी मिळून मुकेशवर झडप घालून बेदम मारहाण केली. यानंतर तिघांनी खोलीतील फरशी स्वच्छ केली आणि पहाटेच्या सुमारास मुकेशचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून खोलीजवळील निर्जनस्थळी नेला. तिथे त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर विटा व दगडाने प्रहार करून त्याची हत्या केली. मृतदेहावर गवत टाकून त्यांनी खोली सोडली आणि तिथून पळून गेले.
कसा झाला उलघडा
कडाचीवाडी परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकानं तपास सुरू केला. परिसरात मृतदेहाचे फोटो दाखवून चौकशी करण्यात आली. तेव्हा खोलीची माहिती मिळाली. खोलीमककडून मोबाईल नंबर मिळवून तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर संशयित छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे उघड झाले. तपासानंतर संशयितांना अटक केली आहे. तिघांकडून चौकशी सुरु असून, तिघांकडून चौकशी सुरू असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या खुनामुळे चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.