Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! भरदिवसा पत्नीसमोरच केले पतीचे अपहरण; यवतमाळच्या उमरखेड येथील घटना

जुन्या वादावरून हरदडा फाटा येथे अडवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. एवढ्यावरच आरोपी न थांबता विकासला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 29, 2025 | 12:40 PM
धक्कादायक ! भरदिवसा पत्नीसमोरच केले पतीचे अपहरण; यवतमाळच्या उमरखेड येथील घटना

धक्कादायक ! भरदिवसा पत्नीसमोरच केले पतीचे अपहरण; यवतमाळच्या उमरखेड येथील घटना

Follow Us
Close
Follow Us:

उमरखेड : तालुक्यातील मानकेश्वर येथील पती-पत्नी दुचाकीवर उमरखेडकडे दवाखान्यात येत असताना हरदडा फाट्याजवळ 7 जणांनी दोघांनाही मारहाण केली. या दुचाकीवर बसवून पतीचे अपहरण केले. ही घटना शुक्रवारी (दि.27) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेला 24 तास उलटूनही केवळ एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.

याप्रकरणी पल्लवी विकास पतंगे यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दिली. त्यावरून परमेश्वर माने, सुशील माने, अक्षय माने, गजानन माने, शिवाजी माने, संदीप माने, स्वप्नील माने (सर्वजण रा. चातारी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विकास पतंगे (वय 22, रा. मानकेश्वर, ता. उमरखेड) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मानकेश्वरवरून उमरखेडकडे मोटरसायकलवर येणाऱ्या विकास पतंगे व त्यांच्या पत्नीला समोरून येणाऱ्या 7 आरोपींनी महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये वाद घातला होता. त्यावेळी विकासने आरोपी विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार का दिली? या जुन्या वादावरून हरदडा फाटा येथे अडवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. एवढ्यावरच आरोपी न थांबता विकासला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. तसेच आरोपींनी जात असताना तुझ्या पतीला जीवाने मारतो, अशी धमकी देत अपहरण केल्याची तक्रार अपहृताची पत्नी पल्लवी हिने पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी विरोधात खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे गुन्हे नोंदविले. या 7 आरोपीपैकी संदीप माने (वय 28) यास अटक केली, तर उर्वरित आरोपींचा शोध युद्धस्तरावर घेतला जात आहे.

Web Title: Husband kidnapped in day time in front of his wife incident in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • crime news
  • yavatmal news

संबंधित बातम्या

पत्नी माहेरी जाताना दाम्पत्यामध्ये वाद; नंतर मृतदेहच आढळल्याने नातेवाईकांना धक्का
1

पत्नी माहेरी जाताना दाम्पत्यामध्ये वाद; नंतर मृतदेहच आढळल्याने नातेवाईकांना धक्का

मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक; दागिन्यांसह केला पोबारा
2

मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक; दागिन्यांसह केला पोबारा

छतावरून कोसळून कामगाराचा मृत्यू; टिनाचे पत्रे ठोकत असताना अचानक 20 फूट खाली कोसळला अन्…
3

छतावरून कोसळून कामगाराचा मृत्यू; टिनाचे पत्रे ठोकत असताना अचानक 20 फूट खाली कोसळला अन्…

एसटीच्या तिकीटासाठी क्यूआर कोडसह ऑनलाईन पेमेंटला पसंती; फक्त एका आठवड्यात…
4

एसटीच्या तिकीटासाठी क्यूआर कोडसह ऑनलाईन पेमेंटला पसंती; फक्त एका आठवड्यात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.