अंबननाथमध्ये पतीने घेतला पत्नीचा क्षुल्लक कारणाने जीव
अंबरनाथ : पूर्वेच्या पालेगाव परिसरात पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीला शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आठ दिवसांपूर्वी पालेगाव येथील पार्श्वहिल गृहसंकुलात ही घटना घडली होती. हत्येनंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपी पतीला शिवाजीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथून अटक केली आहे. विकी बबन लोंढे(२७) असं या आरोपीच नाव असून कौटुंबिक वादातून त्याने पत्नीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालेगाव परिसरात असलेल्या पार्श्वहिल गृहसंकुलात विकि लोंढे त्याची पत्नी रुपाली लोंढे (२६) मुलगी कु.विधी (१) तसेच वडील रामचंद्र लोंढे (५६) हे राहण्यास होते. काही दिवसांपूर्वी बहिण दीपाली भिसे (२८) ही माहेरी राहण्यास आली होती. २०२० मध्ये विकि याने पत्नी रुपाली हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. दरम्यान ८ ऑक्टोबर रोजी रुपाली लोंढे हीचा खून झाल्याने दीपाली भिसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सांगण्यात आले आहे.
कसा काढला काटा
नेहमीप्रमाणे विकी लोंढे आणि त्याचे वडील हे खासगी कंपनीत कामावर गेले होते. त्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजता विकी कामावरून घरी आला. सायंकाळी वीज गेल्याने बहीण दीपाली भिसे या आपल्या लहान मुलीला इमारतीच्या खाली खेवळत होत्या. त्याचदरम्यान विकी लोंढे, त्याची पत्नी रुपाली आणि मुलगी विधी हे तिघेच घरात होते.
सायंकाळी विकी हा मुलीला घेऊन इमारतीच्या खाली उतरला आणि बहिणीकडे मुलीला देऊन मी फुले आनण्यासाठी जात असल्याच सांगून बाहेर पडला. सायंकाळी ७:३० च्या दरम्यान दीपाली भिसे यांचे वडील कामावरून घरी आले तेव्हा घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने कोणी उघडत नसल्याचं पाहून त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडण्यात आले.
रूपाली लोंढेचा मृतदेह
मात्र यावेळी समोरील दृश्य पाहुन सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. रक्ताच्या थारोळ्यात रुपाली लोंढे हिचा मृतदेह दिसून आला. घटनेची महिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील आणि पोलीस उप आयुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला.
हेदेखील वाचा – पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई; चाेरीच्या तब्बल 18 दुचाकी केल्या जप्त
आरोपी फरार
८ दिवसात आरोपीला अटक
दरम्यान पत्नीचा जीव घेतल्यानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपी पतीच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी तपासाची सूत्र आपल्या हाती घेऊन पोलिसांची विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.
दरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. आरोपी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सिराज शेख, पोलीस हवालदार भागवत सैंदाने, पोलिस हवालदार कैलास पादिर यांनी थेट उत्तर प्रदेश गाठलं.
वेषांतर करून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान चौकशीत विकी लोंढे आणि त्याची पत्नी रुपाली यांच्यात मुलीचा सांभाळ व्यवस्थित होत नसल्याने वाद निर्माण झाले होते, त्यातूनच विकीने रुपलीचा बेल्टने गळा आवळून, धारदार शस्त्राने वार करून जीव घेतल्याचंपोलीस तपासात समोर आलं. ही माहिती पोलीस उप आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. दरम्यान घटनेनंतर आठ दिवसांत आरोपीला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.