घृणास्पद! दोन मित्रांना बोलावून पतीचा पत्नीवर लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X)
कोलकाता, बदलापूर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनेचं तीव्र पडसाद देशभर पाहायला मिळाले. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली की नाही? असा प्रश्न उपस्थित होते. या नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळे, ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजवत आहेत. असं संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे.असे असतानाही पिंपरी चिंचवडमधून अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास पतीकडून सांगण्यात आसे. तसेच या घटनेचा व्हिडीओ शूटिंग ही केले. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पुनावळे येथेही घडली असून पीडित तरुणी आणि सर्व आरोपी हे उच्चशिक्षित असून, एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला आहेत.
याप्रकरणी ३० वर्षीय पत्नीने ठाणे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र, हा प्रकार रावेत भागात घडल्याने हे प्रकरण तपासासाठी बुधवारी (१६ ऑक्टोबर) रावेत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. अभियंत्याच्या पत्नीने फिर्याद दिल्यानंतर तिच्या पतीसह चौघांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर 2023 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत पुनावळे येथे हा प्रकार घडला.
आरोपी पतीने तीन पुरुषांना वेगवेगळ्या दिवशी आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. तसेच अत्याचाराची अश्लील छायाचित्रे तयार केली. हे चित्र प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. पत्नीने त्याला विरोध केला असता त्याने धमकी दिली.पत्नी सध्या ठाणे येथे असलेल्या घरी राहून काम करत आहे. तिचे आणि पतीचे काही दिवसांपासून वाद सुरू होता. पुनावळे येथे हा प्रकार घडला तेव्हा सगळे जण एका पार्टीसाठी आले होते. त्यानंतर सलग तीन दिवस पतीने त्याच्या मित्रांबरोबर पत्नीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. रावेत पोलीस अधिक तपास करीत आहेत.