Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

दयानंद खाडगे यांच्यावर गोळेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा सातारा जिल्हा गटसचिव संघटनेने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 06:34 PM
सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास..., गटसचिव संघटनेचा इशारा

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास..., गटसचिव संघटनेचा इशारा

Follow Us
Follow Us:

रहिमतपूर : सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथील विकास सेवा सोसायटीचे सचिव दयानंद खाडगे यांच्यावर गोळेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा सातारा जिल्हा गटसचिव संघटनेने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील गटसचिवांचे कामकाज बंद करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

 

ग्रामीण भागात शेतकरी हिताचे शासकीय व सहकारी संस्थांचे काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला होणे म्हणजे प्रशासनालाच दिलेले खुले आव्हान असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. या घटनेमुळे सचिव व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच सचिव व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ तळेकर, प्रशासन अधिकारी मकरंद भोसले, प्रतिनिधी कल्याण भोसले, विकास भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेने स्पष्ट इशारा देताना म्हटले आहे की, विकास सेवा सोसायटीच्या सचिवावर झालेल्या हल्ल्याची दखल प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तात्काळ कारवाई करावी. अन्यथा जिल्हाभरातील सर्व गटसचिव एकत्र येत कामकाज बंद करून तीव्र आंदोलन उभारतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.

हे सुद्धा वाचा : विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का?

पुणे शहरापासून अत्यंत जवळचा तालुका म्हणून पुरंदरची ओळख आहे. सासवड शहर पुण्याचे उपनगर म्हणून बघितले जात आहे. मात्र, सध्या तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना संघटीतपणे मारहाण केली जात आहे. दुचाकीस्वार सायलेन्सरच्या पुंगळ्याचे मोठाले आवाज करून मोकाट फिरत आहेत. चोरीच्या मोठमोठ्या घटनांचा तपास केवळ कागदावर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी, केबल चोरून नेल्या जात आहेत. एकूणच गुन्हेगार मोकाट सुटल्याचे दिसत असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा : पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

Web Title: The group secretary organization has become aggressive due to the beating of dayanand khadge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Satara News

संबंधित बातम्या

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
1

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
2

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!
3

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
4

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.