Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

म्हसवड पालिका हद्दीत असलेल्या विरकरवाडी येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेत विद्यार्थिनीला शाळेतील महिला शिक्षिकेने मारहाण करुन जखमी केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 06:23 PM
विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

Follow Us
Close
Follow Us:

म्हसवड : म्हसवड पालिका हद्दीत असलेल्या विरकरवाडी येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेत विद्यार्थिनीला शाळेतील महिला शिक्षिकेने मारहाण करुन जखमी केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. संबंधित शिक्षिकेच्या विरोधात पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तर संबंधित शिक्षिकेनेही शाळेतील सर्व विद्यार्थी एकत्र करीत संबंधित पालकांनीच आपल्याला दमदाटी करुन मारहण केल्याचा आरोप करीत सर्व विद्यार्थ्यांसमावेत पोलीस स्टेशन गाठले.

 

पाठोपाठच शिक्षक व इतर पालकांनीही म्हसवड पोलीस स्टेशन गाठल्याने पोलीस स्टेशनच्या आवारातच विद्यार्थ्यांची शाळा भरल्याचे चित्र दिसून आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विरकरवाडी येथील शाळेत विद्यार्थिंनीना सोबत घेऊन एक शिक्षिका शाळेची स्वच्छता करीत होत्या. त्यावेळी दोन्ही विद्यार्थिनींची तक्रार आली. ती तक्रार ऐकून संबधित दोन्ही विद्यार्थिनींना शिक्षिकेने बोलावले असता, त्यातील एक विद्यार्थिनी ही शाळेच्या ड्रेसवर न येता वेगळ्याच ड्रेसवर आल्याने संबंधित शिक्षिकेने याबाबत तिच्याकडे विचारणा करीत तिला शिक्षा म्हणून हातावर काठीने मारले, असे संबंधित शिक्षिकेचे म्हणणे आहे.

तर आपणाला शिक्षिकेने यापुर्वीही दोन चार वेळा मारहाण केली असून आज केलेल्या मारहाणीतून आपल्या हाताच्या बोटातुन रक्त येऊ लागल्याने मी संबंधित शिक्षिकेने आपल्याला केलेली मारहाण शाळेच्या प्राचार्यांना सांगितली असून त्यानंतर प्राचार्यांनी मला घरी जायला सांगितल्यावर मी घरी जात असताना माझी आजी रस्त्यात भेटली. तिने माझ्या हातातून येत असलेले रक्त पाहून शाळा गाठली व संबंधित शिक्षिकेला त्या ठिकाणी जाब विचारला असता, संबंधित शिक्षिकाच माझ्या आजीच्या अंगावर धावून गेली असल्याचे विद्यार्थिनीचे मत आहे.

ही घटना जेव्हा संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांनीही शाळेत धाव घेत याबाबत शाळेल प्रशासनाला जाब विचारला. त्यावेळी संबंधित शिक्षिकेने आपल्यालाही उलट, सुलट उत्तरे दिल्याचा आरोप संबंधित मुलीच्या पालकांनी केला असून त्यांनी या प्रकारानंतर मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठल्याने संबंधित शिक्षिकेने आपल्या बचावासाठी संपूर्ण वर्गच सोबत घेत पोलीस स्टेशन गाठल्याने पोलीस स्टेशन मध्ये एकच गोंधळ उडाला. ही बाब जेव्हा विरकरवाडीतील ग्रामस्थांना समजल्याने अनेक ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली, तर अनेक पालक हे पोलीस स्टेशनला गेल्याची माहिती समजताच शाळेतील प्राचार्य व शिक्षकही पोलीस स्टेशनला आल्याने त्या ठिकाणी पालक, विद्यार्थी व शिक्षक अशी एकच गर्दी दिसून आल्याने पोलीस स्टेशन मध्येच विद्यार्थ्यांची शाळा भरल्याचे चित्र दिसुन आले.

दरम्यान यावेळी अनेक शिक्षकांनी संबंधित शिक्षिकेला समजुन सांगण्याचा प्रयत्न केला, तर अनेक पालकांनी पोलीस स्टेशनला तुम्ही विद्यार्थी का घेऊन आला याचाही जाब विचारला, तर संबंधित मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीला यापुर्वीही संबंधित शिक्षिकेने मारहान केली होती मात्र आजची मारहाण आपणाला सहन झाली नाही त्यामुळे सदर शिक्षिकेच्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला धाव घेतली असल्याचे सांगितले.

पालक – शिक्षिकेची पोलीसांसमोरच तु तु मै मै

शाळेतील हा वाद पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस स्टेशनच्या आवारात सर्व शालेय विद्यार्थी जमा झाल्याने पोलीस स्टेशनचे कर्मचारी बाहेर आल्यावर त्यांनी काय झाले आहे, असे विचारताच संबंधित शिक्षिका व पालक यांच्यात वाद सुरु झाला त्यावेळी काही पालकही यात सहभागी झाल्याने पोलीसांसमोरच या सर्वांची तु तु मै मै सुरु झाल्याने अखेर पोलीसांनी आवारात गोंधळ घालु नका, तक्रार द्यायची असेल तर द्या अन्यथा घरी जावा अशी सर्वांनाच तंबी दिली.

हे सुद्धा वाचा : पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

सदर शिक्षिकेची बदली करावी – माजी नगरसेवक दिपक बनगर

शाळेत घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे, शाळेतील प्रकाराबाबत संबंधित शिक्षिकेने प्राचार्यांना सांगायला हवे होते, मात्र वर्गातील सर्व विद्यार्थी घेऊन तडक पोलीस स्टेशनला जायला नको होते, हा प्रकार शाळेच्या इतिहासात प्रथमच घडला आहे. हा प्रकार आमच्या वाडीचे नाव खराब करणारा असुन सदर प्रकाराबाबत आपण संबंधित शिक्षिकेच्या बदलीची मागणी शालेय प्रशासनाकडे करणार असल्याचे माजी नगरसेवक दिपक बनगर यांनी सांगितले.

Web Title: An incident of an argument between a students parents and a teacher has taken place in mhaswad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • crime news
  • Mhaswad
  • Teachers

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?
1

महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?

Amravati Crime: संतापजनक! ‘… म्हणून आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचे केले टक्कल; नेमका विषय काय?
2

Amravati Crime: संतापजनक! ‘… म्हणून आई-वडिलांनी 16 वर्षीय मुलीचे केले टक्कल; नेमका विषय काय?

Sangamner Crime News: दत्तधाम आश्रमातील धक्कादायक वास्तव समोर! राजेंद्र गडगेचे २०० हून अधिक व्हिडिओ जप्त
3

Sangamner Crime News: दत्तधाम आश्रमातील धक्कादायक वास्तव समोर! राजेंद्र गडगेचे २०० हून अधिक व्हिडिओ जप्त

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…
4

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.